God Is Real : हार्वर्डच्या खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. विली सून यांनी केलेल्या संशोधनानं एक गणितीय सूत्र तयार केलं आहे, जे देवाचे अस्तित्व सिद्ध करू शकते. वैश्विक स्थिरांक आणि सूक्ष्म-ट्यूनिंग आर्ग्युमेंटचे परीक्षण करून हा सिद्धांत असा दावा करतो की, विश्वाचे अचूक नियम हे योगायोग नाहीत. तर, त्यांची हेतूपुरस्सर रचना तयार करण्यात आली आहे, असं हा सिद्धांत सूचित करतो. या दाव्यामुळे उच्चतम बुद्धिमत्तेचे कोणीतरी (देव) अस्तित्वात असल्याबद्दल वैज्ञानिक आणि धार्मिक समुदायांमध्ये वादविवाद सुरू झाले आहेत.
देव आहे की नाही, याविषयी जगात दोन प्रमुख विचारधारा आहेत. एक आस्तिक वर्ग, जो म्हणतो जगाचे पान सुद्धा देवाच्या मर्जीशिवाय हालत नाही. तर दुसरा वर्ग जो देवाचे अस्तित्वतच मानत नाही. तो म्हणतो हे सर्व झूठ आहे. देव ही मानव निर्मित संकल्पना, विचार आहे. हा वाद हजारो शतकांपासून सुरू आहे. आता डॉ. सून यांच्या या नवीन थेअरीमुळे विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कारण अंतराळ, ब्रह्मांडाविषयी सखोल ज्ञान असणारे स्टीफन हॉकिन्स यांनी देवाचे अस्तित्व नाकारले होते. त्यांच्या दाव्यावर अजून पूर्ण वाद संपलेला नसतानाच आता डॉ. सून यांच्या नवीन दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Chardham Yatra 2025: बद्रीनाथ-केदारनाथला जात आहात? आता मिळणार नाही व्हीआयपी पास किंवा व्हीव्हीआयपी दर्शन
अखेर देवाचा शोध लागला!
हॉर्वर्ड विद्यापीठातील खगोल, भौतिक शास्त्रज्ञ आणि एअरोस्पेस इंजिनिअर डॉ. विली सून यांनी हा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी एक गणितीय फॉर्म्युला पण सांगितला आहे. त्यामुळे जगात एकच चर्चा सुरू झाली आहे. विज्ञान आणि श्रद्धा यांच्यातील रेषा अस्पष्ट करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण खुलाशात, हार्वर्डच्या खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. विली सून यांनी असा दावा केला आहे की, हे गणितीय सूत्र देवाच्या अस्तित्वाचा अंतिम पुरावा असू शकतो. टकर कार्लसन नेटवर्कवर उपस्थित राहून, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. सून यांनी असे सुचवले की, विश्वाची रहस्ये केवळ ताऱ्यांमध्येच लिहिली जाऊ शकत नाहीत - तर ती गणिताच्याच रचनेत असू शकतात.
दैवी समीकरण (फाईन ट्युनिंग आर्ग्युमेंट)
डॉ. सून यांच्या सिद्धांताच्या केंद्रस्थानी "सुक्ष्म-ट्यूनिंग आर्ग्युमेंट" आहे. हे आर्ग्युमेंट म्हणजे, विश्वाचे भौतिक नियम जीवनाला आधार देण्यासाठी इतके परिपूर्णपणे घडवलेले आहेत की, ते योगायोगाने घडू शकत नाहीत, अशी ही कल्पना आहे. केंब्रिजचे गणितज्ञ पॉल डायरॅक यांनी प्रथम मांडलेले हे सूत्र काही वैश्विक स्थिरांक कसे चित्तथरारकपणे अचूकतेशी कसे जुळतात, यावर प्रकाश टाकते - ही एक अशी घटना आहे जी अनेक दशकांपासून शास्त्रज्ञांना गोंधळात टाकत आहे.
"देव एक गणितज्ञ आहे"
डॉ. सून यांनी 1963 च्या डायरॅकचे स्वतःचे शब्दच आता प्रतिध्वनीत केले आहेत. यामध्ये गणितज्ञांनी असा अंदाज लावला होता की विश्वातील भौतिक नियमांचे परिपूर्ण संतुलन केवळ उच्चतम बुद्धिमत्तेचेच (अशी बुद्धी असणारा म्हणजेच, देव) काम असू शकते, असे म्हटले आहे. हेच डायरॅक यांनी म्हटले होते. "देव हा एक अतिशय उच्च दर्जाचा गणितज्ञ आहे, असे सांगून परिस्थितीचे वर्णन करता येईल," डायरॅक यांनी प्रसिद्धपणे लिहिले - ही भावना डॉ. सून यांनी पॉडकास्ट दरम्यान उत्कटतेने पुनरुज्जीवित केली.
पॉल डायरॅक यांचा वारसा डॉ. सून यांनी पुढे चालवला
देवाचे अस्तित्व आहे, एक पारलौकिक तत्त्व, परमशक्ती या जगाचे संतुलन ठेवते, अशी मान्यता आहे. याविषयीचे गणितीय सूत्र सर्वात अगोदर केम्ब्रिज विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक, संशोधक पॉल डायरॅक यांनी मांडले होते. डायरॅक यांनी सुचवल्यानुसार, जगातील स्थिरांक हे आश्चर्यकारक पद्धतीने, अचूकतेने जुळतात. जगाच्या भौतिक नियमांचे संतुलन गणितीय सिद्धांताद्वारे समजून येते.
अनेक शास्त्रज्ञ ऐतिहासिकदृष्ट्या विज्ञानाला धर्माशी जोडण्यापासून दूर राहिले असले तरी, डॉ. सून असा युक्तिवाद करतात की, गणित आणि विश्वातील सुसंवाद हेतूपुरस्सर रचनेकडे निर्देश करते. "देवाने आपल्याला हा प्रकाश दिला आहे, तो याचे (प्रकाशाचे) अनुसरण करण्यासाठी आणि आपणास शक्य तितके सर्वोत्तम कार्य करण्यासाठी," असे ते म्हणाले. आपल्या विश्वाचे संचालन करणारी समीकरणे ही दैवी निर्मात्याच्या बोटांचे ठसे असू शकतात, असे डॉ. सून यांनी या संशोधनाअंती सुचवले आहे.
हेही वाचा - Jaya Kishori : जया किशोरी म्हणाल्या, 'रावण रेपिस्ट होता, ब्रह्मदेवाने दिलेल्या 'या' शापामुळे नाईलाजने त्याने सीतेला स्पर्श…'
संशोधनावर वादविवाद आणि चर्चा
स्वाभाविकच, या दाव्याने वैज्ञानिक आणि धार्मिक वर्तुळात जोरदार वादविवाद सुरू केले आहेत. या संशोधनावर टीका करणाऱ्या समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे की. फाईन-ट्यूनिंग आर्ग्युमेंटकडे अजूनही ठोस पुरावे नाहीत. तर, देवावर विश्वास ठेवणारे लोक डॉ. सून यांच्या सिद्धांताचे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील 'दुर्मीळ भेटीचे ठिकाण' म्हणून स्वागत करतात.
डॉ. सून यांचे सूत्र श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील दीर्घकाळापासून अपेक्षित असलेला पूल बनते की नाही, हे पाहणे बाकी आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे - विश्वाबद्दलच्या उत्तरांच्या अविरतपणे सुरू असलेल्या शोधात, गणित हे कदाचित दैवी अस्तित्व उघडण्याची गुरुकिल्ली असू शकते.
तर, देव संख्येत लपला आहे का? की, विश्व हे फक्त एक वैश्विक योगायोग आहे? वादविवाद अजून संपलेला नाही - परंतु याची उत्तरे काळापेक्षाही जुन्या असलेल्या समीकरणांमध्ये लिहिली जाऊ शकतात. (काळ किंवा वेळ किंवा Time हा अनादि अनंत आहे, असे मानले जाते. मात्र, इथे गणितीय समीकरणे काळापेक्षाही जुनी असल्याचे म्हटले आहे.)
हेही वाचा - माघ पौर्णिमेला 'या' स्तोत्राचं करा पठण; आयुष्यात समृद्धी राहील, लक्ष्मी माता उजळवेल तुमचं भाग्य