Hanuman Jayanti Lucky Zodiac Signs 2026 : वाल्मिकी रामायणानुसार भगवान हनुमंताचा जन्म कार्तिक कृष्ण चतुर्दशीला झाला. तर, काही ठिकाणी चैत्र पौर्णिमा हा दिवस हनुमान जयंती मानला जातो. या दोन्ही दिवशी मारुतीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. यंदा ज्योतिष शास्त्रानुसार 2 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) शुभ मुहूर्तावर (चैत्र पौर्णिमा) मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. दुपारी 3:37 वाजता मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करेल, जिथे आधीच शनी विराजमान आहे. मंगळ आणि शनीची ही युती 5 राशींच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. भगवान हनुमानाची विशेष कृपा लाभणाऱ्या या लकी राशींचे भविष्य खालीलप्रमाणे आहे.
या वर्षी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीचा उत्सव दोन दिवस विभागलेला आहे. (Hanuman Jayanti 2026 Shubh Muhurta)
चैत्र पौर्णिमा प्रारंभ: 1 एप्रिल 2026 सकाळी 07:06 वाजता.
चैत्र पौर्णिमा समाप्ती: 2 एप्रिल 2026 सकाळी 07:41 वाजता.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या अकराव्या चरणात मंगळ आणि शनीची युती होणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत (New Income Sources) निर्माण होतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरेल. यामुळे तुमच्या समृद्धी आणि संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी ही युती भाग्योदयाची ठरणार आहे. जे लोक व्यवसाय क्षेत्रात आहेत, त्यांना मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. करिअरमध्ये यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि प्रलंबित कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे तुमचे व्यावसायिक जीवन अधिक स्थिर होईल.
हेही वाचा – Shani Sadesati: शनी साडेसातीचा शेवट जवळ! ‘या’ राशींना मोठा दिलासा; आयुष्यात होणार सकारात्मक बदल
सिंह रास (Leo)
सिंह राशीवर मंगळ आणि शनीच्या युतीचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तुमच्या मालमत्तेत वाढ होईल आणि कौटुंबिक सुख लाभेल. मात्र, ग्रहांच्या या बदलामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे तुम्ही या शुभ काळाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात शत्रूंवर विजय मिळवता येईल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक तणाव कमी होईल. भगवान हनुमानाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्याने भीती बाळगण्याची गरज नाही, फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीसाठी हा काळ आर्थिक भरभराटीचा असेल. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ योग्य आहे. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल. पैशांची कमतरता भासणार नाही, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक सुखकर होईल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)