Holi 2026: यावर्षीची होळी खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे. 2 मार्चला 2026 रोजी होळी साजरी झाल्यानंतर 4 मार्चला ग्रहांची एक दुर्मिळ स्थिती पाहायला मिळणार आहे. या दिवशी राहु-केतू या छाया ग्रहांच्या सोबतीने देवगुरु बृहस्पती (गुरु) आणि बुध हे दोन महत्त्वाचे ग्रह देखील वक्री, म्हणजेच 'उलटी चाल' चालणार आहेत. एकाच वेळी 4 ग्रहांची ही वक्री स्थिती काही राशींच्या नशिबाची कवाडे उघडणारी ठरणार आहे.
होळीचा दुर्मिळ योग आणि ग्रहांची स्थिती
हिंदू पंचांगानुसार, सध्या राहु आणि केतू वक्री आहेत, तसेच देवगुरु बृहस्पती देखील वक्री अवस्थेत आहेत. त्यातच 26 फेब्रुवारी 2026 पासून बुध ग्रहाची देखील उलटी चाल सुरू होत आहे. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी 4 मोठे ग्रह वक्री असणे ही एक दुर्मिळ घटना असून, यामुळे 'धन योग' निर्माण होत आहे. याचा सकारात्मक परिणाम प्रामुख्याने मिथुन, तुला आणि मकर राशीवर दिसून येईल.
मिथुन रास: कर्जाच्या विळख्यातून सुटका
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे ग्रह परिवर्तन भाग्योदयाचे ठरेल. तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि सकारात्मक बदल होणार आहेत. समाजात वजन असलेल्या मोठ्या व्यक्तींशी तुमचे संपर्क वाढतील, ज्याचा फायदा भविष्यात होईल. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कर्जाच्या समस्येने तुम्हाला सतावले होते, ती समस्या आता दूर होईल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग आहेत, तसेच जोडीदाराला एखादी महागडी भेट वस्तू तुम्ही देऊ शकता.
तुला रास: उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
तुला राशीच्या जातकांसाठी कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कमाईचे मार्ग वाढतील आणि पैशांच्या बचतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच आकर्षण निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. सरकारी कामात जे अडथळे येत होते, ते आता दूर होतील. एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्राची प्रतीक्षा संपेल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे.
मकर रास: करिअरमध्ये मोठी भरारी
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ जनसंपर्क वाढवण्याचा आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीची गाठ पडेल, जी तुमच्या करिअरमध्ये मदत करेल. व्यापार-व्यवसायात जाहिरात आणि संपर्काचा वापर केल्यास मोठा नफा होईल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल. सृजनात्मक (Creative) कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल आणि तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. करिअरमध्ये प्रगती करण्याची जबरदस्त उर्मी तुमच्यामध्ये दिसून येईल.
हेही वाचा – Kedarnath Temple Doors: बाबा केदारनाथांच्या भक्तांसाठी मोठी बातमी; 'या' दिवशी उघडणार मंदिराचे दरवाजे
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)