Tuesday, March 17, 2026 02:46:34 PM

Blood Moon Perfect Photo : फोटोग्राफर्सहो तयार राहा! 'या' वेळेत क्लिक करा सुंदर 'ब्लड मून'चे फोटो

चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:48 वाजता संपेल. जयपूरमध्ये चंद्र संध्याकाळी 6:29 वाजता उगवेल आणि ग्रहण संध्याकाळी 6:48 वाजता संपेल,

blood moon perfect photo  फोटोग्राफर्सहो तयार राहा या वेळेत क्लिक करा सुंदर ब्लड मूनचे फोटो

 उद्या, 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले 'खग्रास चंद्रग्रहण' असून, आकाशात 'ब्लड मून' पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.  चंद्रग्रहण 3 मार्च रोजी दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:48 वाजता संपेल. जयपूरमध्ये चंद्र संध्याकाळी 6:29 वाजता उगवेल आणि ग्रहण संध्याकाळी 6:48 वाजता संपेल, ज्यामुळे ग्रहण कालावधी फक्त 18 मिनिटे राहील. भारतात चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी फक्त 25 मिनिटे असेल. दिल्लीमध्ये, चंद्रोदयाच्या वेळेनुसार ग्रहण फक्त 25 मिनिटे दिसेल. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये, ग्रहणाचा कालावधी अंदाजे 59 मिनिटे असेल. 

ब्लड मून म्हणजे काय? 
खग्रास चंद्रग्रहणादरम्यान जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित होऊन चंद्रावर पडतो. यामुळे चंद्र पूर्णपणे काळा न पडता तांबूस किंवा लालसर दिसतो, ज्याला 'ब्लड मून' म्हणतात. हा नजारा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सर्वोत्तम असतो.

हेही वाचा - Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आता होणार स्वयंपाकघरावर? डाळी आणि एलपीजी महाग होण्याची शक्यता 

कधीपर्यंतची वेळ फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम? 
महाराष्ट्रात ग्रहण सुटण्याची वेळ सायंकाळी 6:48 आहे. त्यामुळे चंद्रोदयापासून ते 6:48 पर्यंतची वेळ फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम असेल. या काळात चंद्र क्षितिजाच्या जवळ असल्याने तुम्हाला इमारती किंवा झाडांच्या पार्श्वभूमीवर अप्रतिम 'लँडस्केप' शॉट्स घेता येतील. मुंबईमध्ये चंद्रग्रहणाची वेळ काय असेल: अनेक खगोलप्रेमींना उत्सुकता लागली असेल की मुंबईमध्ये नेमकी ग्रहणाची वेळ काय असेल आणि ब्लड मूनचा परफेक्ट नजर कधी टिपता येणार आहे. तर मुंबईमध्ये संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ब्लड मून पाहता येणार आहे. पण हे ग्रहण फक्त 3 मिनिटे म्हणजेच 6:45 ते 6:48 या वेळेतच दिसणार आहे.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती खगोलीय ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


 


सम्बन्धित सामग्री