Budh Gochar 2025: 22 जून 2025 रोजी रात्री 9:33 वाजता बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धी, व्यवसाय, संवाद कौशल्य आणि आर्थिक स्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव काही विशिष्ट राशींवर विशेषरूपाने जाणवतो. यंदाच्या गोचरामुळे पाच राशींच्या जीवनात मोठा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः आर्थिक क्षेत्रात या राशींना नशिबाची साथ लाभणार असून, अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Weekly Horoscope June 15 to June 21: ग्रहांची चाल बदलणार नशिबाची दिशा? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
मिथुन राशी (Gemini):
बुध या राशीचा स्वामी असल्यामुळे, मिथुन राशीच्या लोकांना या गोचराचा चांगला फायदा होईल. जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक बाबतीत चांगले निर्णय घेतल्याने उत्पन्नात वाढ होईल. परदेशी संधी मिळण्याचीही शक्यता आहे.
कर्क राशी (Cancer):
बुध ग्रह थेट कर्क राशीत प्रवेश करत असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी ही काळ अतिशय शुभ आहे. नवीन नोकरी, प्रमोशन किंवा नव्या संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या नवे दरवाजे उघडतील आणि शेअर बाजारात गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो.
कन्या राशी (Virgo):
या राशीच्या लोकांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळेल. बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता असून, जुनी अडथळ्यांमुळे थांबलेली कामं आता पूर्ण होतील. कौटुंबिक आयुष्यातही आनंदाचे क्षण येतील.
मीन राशी (Pisces):
बुधच्या कृपेने व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक लाभ होऊ शकतात. सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मानात वाढ होईल. मागील आर्थिक नुकसान भरून निघू शकते.
तूळ राशी (Libra):
तूळ राशीसाठी हा काळ मनासारखा जाईल. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक प्रगतीचा योग आहे. सध्याच्या नोकरीत बढती मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
या पाच राशींसाठी बुध गोचर म्हणजे एक सुवर्णसंधी असून, योग्य नियोजन आणि प्रयत्नांमुळे आर्थिक स्थैर्य व यश मिळवता येईल. मात्र कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करावी, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)