Pandharpur Vitthal Rukmini temple: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात या कालावधीत विठूरायाचे दर्शन पूर्णपणे बंद

या काळात मूर्ती जतन आणि संवर्धनाची ही संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे पार पाडली जाणार आहे. जून 22 ते जून 24 या 3 दिवसांच्या कालावधीत ही संवर्धन प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

Pandharpur Vitthal Rukmini temple: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात या कालावधीत विठूरायाचे दर्शन पूर्णपणे बंद

Pandharpur Vitthal Rukmini Darshan Closed : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि पर्यटकांसाठी मंदिर प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. 22 जून, 23 जून  आणि जून 24 रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या तीन दिवसांत भाविकांनी दर्शनासाठी पंढरपूरला येऊ नये, असे जाहीर आवाहन प्रशासनाने केले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची होणारी नैसर्गिक झीज रोखण्यासाठी संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) छत्रपती संभाजीनगर, राज्य पुरातत्त्व विभाग पुणे आणि मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या थेट मार्गदर्शनाखाली हे काम केले जाईल.

विठ्ठल मूर्तीवर होणार रासायनिक लेपन प्रक्रिया
गेल्या काही काळापासून विठ्ठल मूर्तीच्या पायाला खड्डा पडल्याचे आणि इतर भागांतही झीज झाल्याचे समोर आले होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी संप्रदाय आणि पुरातत्व विभागाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मूर्तीवर पारंपारिक पद्धतीने उपचार करायचे की रासायनिक, यावर बराच खल झाल्यानंतर अखेर रासायनिक पद्धतीनेच लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मूळ दगडाची पूड ऑरगॅनिक रसायनात (epoxy resin) मिसळून झिजलेल्या भागांची दुरुस्ती केली जाईल आणि मूर्तीचे आयुष्य वाढवण्यासाठी एक सुरक्षित कवच (Protective Coating) दिले जाईल. मूर्ती जतन आणि संवर्धनाची ही संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे पार पाडली जाणार आहे.

हेही वाचा – Tuljapur Temple : तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! आता मंदिर परिसरात 'हे' कृत्य केल्यास भरावा लागणार 500 रुपयांचा दंड

पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली संवर्धनाचे काम
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकत्याच दि.11 जून रोजी एस कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध तज्ज्ञ, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्य आणि संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. प्राप्त तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारशींच्या आधारे दिनांक 22 ते 24 जून या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. तांत्रिक कामाची अचूकता, मूर्तीची सुरक्षा आणि तिचे पावित्र्य राखण्यासाठी प्रत्यक्ष कामाच्या वेळी म्हणजेच जून 23 आणि जून 24 रोजी मंदिर बंद ठेवले जाईल.

पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा संरक्षणात्मक पाऊल
विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचे लेपन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वर्ष 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्ये देखील मूर्तीचे यशस्वीरीत्या संवर्धन करण्यात आले होते. मागील प्रक्रियेला आता सुमारे 5 वर्षांचा काळ उलटून गेल्याने मूर्तीमध्ये नैसर्गिक सूक्ष्म छिद्रे आणि झीज दिसून येत होती. आषाढी वारीमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन लक्षात घेता, पुरातत्व विभागाच्या नियमानुसार हे पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक बनले होते.

हेही वाचा – Navpancham Rajyog 2026: 15 दिवसांनी चमकणार 'या' 4 राशींचं नशीब! शनी-शुक्राच्या विशेष राजयोगामुळे आयुष्यात होणार मोठे बदल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number