Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भाऊ नाही? काळजी करू नका! ‘या’ देवतांना राखी अर्पण करा आणि जाणून घ्या मान्यता

यंदा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार असून प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधणार. रक्षाबंधनाचा हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि सुरक्षेच्या वचनाचं प्रतीक मानला जातो.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भाऊ नाही? काळजी करू नका! ‘या’ देवतांना राखी अर्पण करा आणि जाणून घ्या मान्यता

यंदा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार असून प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधणार. रक्षाबंधनाचा हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि सुरक्षेच्या वचनाचं प्रतीक मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार, रक्षाबंधन हा बहीण-भावांचा अतिशय पवित्र सण आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमेला साजरा केला जाणारा रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भावनिक सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो. मात्र, जर तुम्हाला भाऊ नसेल तर काय करायचं? निराश होऊ नका, धार्मिक परंपरेनुसार काही देवांना देखील राखी बांधता येऊ शकते. 

हेही वाचा- Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला? वाचा नेमका कधी आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या देवांना राखी बांधावी?
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव असला तरी भाऊ नसल्यामुळे बहिणी निराश होतात आणि कोणाला राखी बांधायची या विचारात पडतात. मात्र तुम्हाला निराश होण्याची गरज नाही, तुम्ही काही देवांना राखी बांधून त्यांच्याकडून आपलं रक्षण करण्याचे वचन घेऊ शकता.  

1. भगवान श्रीकृष्ण- भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला जखम झाल्यावर पांडवांची पत्नी द्रौपदी हिने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला. त्या ऋणाची परतफेड म्हणून श्रीकृष्णांनी द्रौपदीचे चीरहरणाच्या वेळी रक्षण केले. त्यामुळे राखी हे केवळ धाग्याचे नव्हे, तर निःस्वार्थ प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाला भगवान श्रीकृष्णाला राखी बांधणे पवित्र मानले जाते.

2. भगवान हनुमान- रामाचे परम भक्त म्हणून ओळख असलेल्या हनुमानाला शक्ती, धैर्य आणि संकटमोचक देवता मानले जाते. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानाला राखी बांधल्यास किंवा अर्पण केल्यास धैर्याने समोर आलेल्या संकटांपासून संरक्षण करण्याचे बळ मिळते. 

3. इंद्र देव- देव आणि दानव यांच्यातील युद्धात देवांचा पराभव होत होता. तेव्हा देवांची राणी इंद्राणी (शची) हिने मंत्रोच्चार करून एक पवित्र रक्षासूत्र तयार केले आणि ते इंद्राच्या मनगटावर बांधले. त्यानंतर इंद्राला विजय मिळाला. ही कथा रक्षाबंधनाच्या धार्मिक महत्त्वाशी जोडली जाते. 

4. भगवान विष्णू आणि भगवान शिव- भगवान विष्णूंना पालनकर्ता म्हणातात तर शिव हे रक्षण आणि कल्याणाचे प्रतीक मानले जातात. हे दोघे ही त्रिदेवांचे रुप आहेत. त्यामुळे भगवान शिव आणि विष्णूंना राखी अर्पण करून जीवनात संरक्षण, स्थैर्य आणि सुख-समृद्धी मिळावी, अशी धार्मिक भावना व्यक्त केली जाते.

5. भगवान गणेश- गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी गणेशाला राखी अर्पण करून संकटांपासून संरक्षण आणि शुभत्वाची प्रार्थना केली जाते.

हेही वाचा- Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिरात पुरुषांना प्रवेशबंदी; ‘या’ एका तासात दर्शन बंद, जाणून घ्या कारण

राखी उजव्या हाताच्या मनगटावरच का बांधली जाते? जाणून घ्या
दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जाणारा रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचा प्रतीक मानला जातो.  बहिण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर धागा बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती अधिक असते, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी महत्त्वाचे असते. उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानले जाते त्यामुळे राखी देखील फक्त उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते. उजव्या मनगटावर राखी बांधल्याने त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. मनगटावर राखी बांधल्याने वात, पित्त, कफ संतुलित होतात. मनगटावर राखी बांधल्याने आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राचा मनावर सकारात्मक परिणाम होतो.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number