Today’s Horoscope 2026 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रमोशनची संधी मिळेल; वाचा आजचे राशिभविष्य

आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या सविस्तर राशिभविष्य.

Today’s Horoscope 2026 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रमोशनची संधी मिळेल; वाचा आजचे राशिभविष्य
Rashi Bhavishya

मेष (ARIES) : दिवसाची सुरूवात द्विधा मनःस्थितीनं होईल. इतरांशी वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्यानं इतरांची मने जिंकू शकाल. आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्यानं शक्यतो नवीन कार्याची सुरूवात करू नये. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल.

वृषभ (TAURUS) : आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरूवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल. दुपारनंतर मात्र द्विधा मनःस्थिती झाल्यानं आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.

मिथुन (GEMINI) : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक व्यग्रता जाणवेल. दुपारनंतर कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल.

कर्क (CANCER) : आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. एखादा अपघात संभवतो.

सिंह (LEO) : आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.

कन्या (VIRGO) : आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल. सामाजिक मान – सन्मान मिळाल्याने मन प्रसन्न होईल.

तूळ (LIBRA) : नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील. पण दुपार नंतर मात्र परदेशस्थ मित्र व संबंधितांकडून काही चांगली बातमी आल्याने आपला आनंद द्विगुणित होईल.

वृश्चिक (SCORPIO) : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. एखादा प्रवास संभवतो. दुपारनंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आहाराकडं विशेष लक्ष द्यावे लागेल.

धनू (SAGITTARIUS) : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.

मकर (CAPRICORN) : आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कामे पूर्ण होऊ शकतील.

कुंभ (AQUARIUS) : विद्यार्थी, कलाकार व खेळाडू यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा.

मीन (PISCES) : आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्यादृष्टीनं आजचा दिवस अनुकूल आहे.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number