Vaishakh Purnima 2026 : वैशाख पौर्णिमेला दुर्मिळ ‘सिद्धी योग’! जीवनातील संकटे दूर करण्यासाठी ‘या’ शुभ मुहूर्तावर करा दानधर्म

केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर बौद्ध धर्मातही वैशाख पौर्णिमा या दिवसाला विशेष स्थान आहे. कारण, ही तिथी भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी जोडलेली आहे.

Vaishakh Purnima 2026 : वैशाख पौर्णिमेला दुर्मिळ ‘सिद्धी योग’! जीवनातील संकटे दूर करण्यासाठी ‘या’ शुभ मुहूर्तावर करा दानधर्म

Vaishakh Purnima 2026 Date, Time, Shubh Muhurt : हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला धर्म, तप आणि साधनेचा अत्यंत पवित्र दिवस मानले जाते. या विशेष तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून गरजू वस्तूंना दान केल्यास अनेक पटीने पुण्य फळ मिळते, अशी जनमानसात धारणा आहे. यावर्षी वैशाख पौर्णिमेला 'सिद्धि योग' जुळून येत असल्याने या दिवसाचे आध्यात्मिक मूल्य अधिकच वाढले आहे. केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर बौद्ध धर्मातही या दिवसाला विशेष स्थान आहे. कारण, ही तिथी भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी जोडलेली आहे.

वैशाख पौर्णिमा 2026 तिथी
यावर्षी वैशाख पौर्णिमा 1 मे रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथीची सुरुवात 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:12 वाजता होणार असून, तिथीची समाप्ती 1 मे 2026 रोजी रात्री 10:52 वाजता होईल. हिंदू शास्त्रानुसार उदयातिथीला महत्त्व असल्याने, पौर्णिमेचे व्रत आणि धार्मिक विधी 1 मे रोजीच केले जातील. जीवनातील संकटे दूर करण्यासाठी आणि सुख-समृद्धी मिळवण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे फलदायी मानले जाते.

स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त
पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे सर्वात उत्तम मानले जाते. भाविकांसाठी मुहूर्ताची वेळ खालीलप्रमाणे असेल:
ब्राह्म मुहूर्त: सकाळी 04:15 ते 05:00 वाजेपर्यंत.
सूर्योदय स्नानाची वेळ: सकाळी 05:35 ते 07:30 वाजेपर्यंत.
या कालावधीत गंगा, यमुना किंवा कोणत्याही पवित्र जलाशयात स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने मनाला शांती मिळते आणि पापांचा नाश होतो, असे मानले जाते.

हेही वाचा – How to reach Kedarnath Dham : केदारनाथ यात्रा करायची आहे? कसं जायचं.. विमान, रेल्वे की बस? जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण रूटमॅप

बुद्ध पौर्णिमेचे विशेष महत्त्व
वैशाख पौर्णिमेला 'बुद्ध पौर्णिमा' म्हणूनही ओळखले जाते. याच पवित्र तिथीला भगवान बुद्धांचा जन्म झाला होता, त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाणही झाले होते. त्यामुळे हा दिवस शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारा ठरतो. यंदाच्या सिद्धी योगामुळे या दिवशी केलेले ध्यान आणि साधना साधकांसाठी विशेष यश देणारी ठरेल. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपांची उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे.

वैशाख पौर्णिमेला हनुमंत पूजेचे महत्त्व
वैशाख पौर्णिमेला भगवान हनुमंताचे पूजन करणे अत्यंत श्रेयस्कर आणि लाभदायक असते. या दिवशी हनुमंताला गुरू मानून पूजन केले जाते. हनुमंताला रुईच्या पानांचा हार अर्पण केला जातो. हनुमंतासमोर दिवा आणि उदबत्ती धूप धूपबत्ती लावून पूजन केले जाते. तसेच, हनुमंतासमोर भिजवलेली हरभऱ्याची डाळ, कैरीचे पन्हे आणि मूगडाळीचे पुरण असा नैवेद्य ठेवला जातो. यानंतर हनुमंताला दिव्यांनी ओवाळून आरती म्हणावी. या दिवशी हनुमंताची उपासना करणे, मारुतीस्तोत्र पठण, हनुमान चालिसा पठण आणि सुंदरकांड पठण अत्यंत लाभदायी असते. श्रद्धा आणि विश्वासपूर्वक पूजन करण्यामुळे हनुमंताचे बल आणि बुद्धी प्राप्त होतात.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: भाविकांसाठी मोठी बातमी! अयोध्या राम मंदिरात बदलले दर्शनाचे नियम 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number