Vivah Shubh Muhurta 2025: विवाह म्हणजे दोन जीवांचं मिलन मानलं जातं. खरंतर यावेळी दोन कुटुंबांचं देखील मिलन होतं. हिंदू धर्मात विवाहाला अत्यंत पवित्र आणि महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक जण इच्छितो की त्याचा विवाह देव-ब्राम्हणांच्या साक्षीने पार पडावा. मंत्रोच्चार, अक्षतांचा पाऊस आणि नातेवाईकांची उपस्थिती असावी. कोणत्याही शुभ काम करण्यापूर्वी पंचांग आणि शुभ मुहूर्त हा पाहिला जातो. विशेषतः विवाहासाठी योग्य मुहूर्त निवडणं अत्यंत आवश्यक असतं.
प्रबोधिनी (देवउठनी) एकादशीच्या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होत आहे. त्या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्ये सुरू होतील. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून बाहेर आल्यावर शुभ कार्यांना प्रारंभ होईल. चातुर्मास संपल्यानंतर लग्नाचा हंगामही सुरू होतो. कार्तिकी एकादशीनंतर नोव्हेंबरमध्ये शुभ विवाह होतील. यंदा देवउठनी एकादशी 2 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. तुळशी विवाह सुद्धा याच दिवशी साजरा केला जाईल. या दिवसापासून विवाह मुहूर्त देखील सुरु होत आहेत.
हेही वाचा: Today Horoscope : 'या' राशींच्या ग्रहांचे शुभ योग, नवीन संधी समोरून येणार, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस?
नोव्हेंबरमधील हे आहेत शुभ मुहूर्त
2, 3, 5, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25 आणि 30 नोव्हेंबर.
वरील तारखांमध्ये विवाहासाठी उत्तम योग निर्माण होतात. डिसेंबर महिन्यात फक्त तीन शुभ मुहूर्त आहेत.
ते म्हणजे 4 डिसेंबर, 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर 2025. विवाहाची तारीख ठरवण्यापूर्वी ज्योतिषी किंवा ब्राम्हणांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)