IPL 2026 Mini Auction: आयपीएल 2026 च्या मिनी लिलावाची जोरदार तयारी सुरू झाली असून, यंदा तब्बल 1,355 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये होणाऱ्या या लिलावासाठी सर्व 10 फ्रँचायझींना 30 नोव्हेंबर रोजी अंतिम यादी देण्यात आली. सध्या संघांकडे एकूण 77 रिक्त जागा आहेत, त्यापैकी 31 स्लॉट परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.
2 कोटींच्या सर्वोच्च बेस प्राईससाठी 45 दिग्गजांची निवड
यंदाच्या लिलावात 45 खेळाडूंनी सर्वोच्च 2 कोटींची बेस प्राईस निवडली आहे. या एलिट यादीत कॅमेरॉन ग्रीन, लियाम लिव्हिंगस्टोन, वानिंदू हसरंगा, मथिशा पाथिराणा यांसारख्या नामांकित परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. भारतीयांमध्ये रवी बिश्नोई आणि वेंकटेश अय्यर हे या श्रेणीत आहेत.
कॅमेरॉन ग्रीनवर मोठ्या बोलीची शक्यता
मेगा लिलावात अनुपस्थित राहिलेला कॅमेरॉन ग्रीन यंदा सर्वात मोठा दावेदार ठरू शकतो. केकेआरकडे 64.3 कोटींची मोठी पर्स आहे आणि सीएसकेकडे 43.4 कोटींची पर्स आहे, ज्यामुळे ते ग्रीनसाठी सर्वात मजबूत दावेदार बनले आहेत. आंद्रे रसेलच्या निवृत्तीमुळे केकेआरला मोठी बोली लावण्याची शक्यता आणखी वाढली आहे. ग्लेन मॅक्सवेलचाही यावेळी आयपीएल लिलावात समावेश नाही. 2025 च्या हंगामात मॅक्सवेलला त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले.
जागतिक दर्जाचे दिग्गजही रिंगणात
लिलावात 14 देशांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. यात स्टिव्ह स्मिथ, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, जोश इंग्लिस, फिन अॅलन, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, डेव्हिड मिलर, अँरिच नॉर्टजे, लुंगी एनगिडी, जेसन होल्डर यांचा समावेश आहे. यावर्षी एक विशेष आकर्षण म्हणजे मलेशियाच्या भारतीय वंशाच्या अष्टपैलू विरनदीप सिंगची नोंदणी, ज्याची बेस प्राईस 30 लाख ठरवण्यात आली आहे.
हेही वाचा – ILT20 2025-26 Live Streaming: ILT20 चा चौथा हंगाम आजपासून सुरू; भारतात सामने कुठे आणि कसे पाहाल? जाणून घ्या
भारतीय खेळाडूंची मजबूत यादी
या लिलावात प्रमुख परदेशी खेळाडूंसह अनेक प्रमुख भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएस भरत, राहुल चहर, नवदीप सैनी यांच्यासह 16 दिग्गज नावं लिलावात उपलब्ध आहेत. तथापी, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक जोश इंगलिस पुन्हा लिलावात सहभागी झाला आहे. 2025 च्या अंतिम सामन्यापर्यंत तो पंजाब किंग्जचा प्रमुख खेळाडू होता.