R Praggnanandhaa: चेस जगतात भारताचा नवा इतिहास; 21 वर्षीय आर. प्रज्ञानंद ठरला ‘ग्रँड चेस टूर’चा नवा चॅम्पियन

जागतिक विजेते विश्वनाथन आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या या चेन्नईच्या खेळाडूने रॅपिड फेरीत सलग 2 सामने जिंकून अप्रतिम पुनरागमन केले आणि सामन्याचे चित्र पालटले.

R Praggnanandhaa: चेस जगतात भारताचा नवा इतिहास; 21 वर्षीय आर. प्रज्ञानंद ठरला ‘ग्रँड चेस टूर’चा नवा चॅम्पियन

R Praggnanandhaa: भारताचा 21 वर्षीय युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने बुद्धिबळ पटावर ऐतिहासिक कामगिरी नोंदवत प्रतिष्ठित 'ग्रँड चेस टूर' (GCT) चे विजेतेपद पटकावले आहे. अमेरिकेतील सेंट लुईस येथे झालेल्या ग्रँड फायनलमध्ये प्रज्ञानंदने बलाढ्य अमेरिकन खेळाडू फॅबियानो कारुआनाचा 15-13 अशा गुणांनी धक्कादायक पराभव केला. अंतिम दिवसाची सुरुवात करताना प्रज्ञानंद तब्बल 6 गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, जागतिक विजेते विश्वनाथन आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या या चेन्नईच्या खेळाडूने रॅपिड फेरीत सलग 2 सामने जिंकून अप्रतिम पुनरागमन केले आणि सामन्याचे चित्र पालटले. या ऐतिहासिक विजयासह प्रज्ञानंद GCT विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.  

1.91 कोटींचे बक्षीस आणि रॅपिड-ब्लिट्झचा थरार
या अविश्वसनीय विजेतेपदासोबतच प्रज्ञानंदने 2,00,000 अमेरिकन डॉलर्सची (सुमारे 1.91 कोटी रुपये) घसघशीत बक्षीस रक्कम आपल्या नावे केली. अंतिम लढतीत रॅपिड सामन्यांनंतर 2 गुणांची निर्णायक आघाडी मिळवल्यानंतर प्रज्ञानंदने ब्लिट्झ टप्प्यात अत्यंत संयमी खेळ केला. कारुआनाने सामना 12-12 असा बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रज्ञानंदने तिसरा ब्लिट्झ सामना जिंकून आणि शेवटचा सामना बरोबरीत सोडवून 15-13 अशा फरकाने आपले पहिले विजेतेपद निश्चित केले. या यशाचे मुख्य श्रेय त्याने आपल्या रॅपिड आणि ब्लिट्झ खेळातील सुधारणेला दिले आहे.  

हेही वाचा – Dev Chaudhary Controversy: क्रिकेटमध्ये मोठं स्कॅम? धड खेळताही येत नाही, लिलावात नाव नाही.. तरीही मैदानात उतरत चक्क ओपनिंग केली अन्…
 
पुढील वर्षाच्या GCT स्पर्धेतील स्थान पक्के

विजयानंतर बोलताना प्रज्ञानंदने प्रामाणिकपणे कबूल केले की, कारुआनासारख्या खेळाडूविरुद्ध 6 गुणांची पिछाडी असताना एकाच दिवसात अशा प्रकारच्या पुनरागमनाची त्याला स्वतःलाही अपेक्षा नव्हती. या विजयामुळे प्रज्ञानंदसह कारुआना आणि तिसऱ्या स्थानावर राहिलेला अमेरिकेचा वेस्ली सो यांनी पुढील वर्षाच्या 'ग्रँड चेस टूर'साठी आपले स्थान थेट निश्चित केले आहे. तिसऱ्या स्थानाच्या लढतीत वेस्ली सोने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरचा 18-12 असा पराभव केला. प्रज्ञानंदच्या या अभूतपूर्व यशामुळे जगभरातील बुद्धिबळ वर्तुळातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number