Australian Open 2026: टेनिस विश्वात नवा इतिहास; कार्लोस अल्काराझने जोकोविचला धूळ चारत जेतेपदावर कोरलं नाव

जोकोविच आपल्या 25 व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शोधात होता, मात्र अल्काराझच्या झंझावातासमोर त्याचे प्रयत्न अपुरे पडले. हे अल्काराझचे पहिले ऑस्ट्रेलियन ओपन आणि कारकिर्दीतील एकूण 7 वे जेतेपद आहे.

Australian Open 2026: टेनिस विश्वात नवा इतिहास; कार्लोस अल्काराझने जोकोविचला धूळ चारत जेतेपदावर कोरलं नाव

Australian Open 2026: स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे जेतेपद पटकावून टेनिस विश्वात नवा इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत अल्काराझने अनुभवी नोवाक जोकोविचचा पराभव केला. जोकोविच आपल्या 25 व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शोधात होता, मात्र अल्काराझच्या झंझावातासमोर त्याचे प्रयत्न अपुरे पडले. हे अल्काराझचे पहिले ऑस्ट्रेलियन ओपन आणि कारकिर्दीतील एकूण 7 वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

अंतिम सामन्यात जोकोविचचा पराभव
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात अल्काराझने सर्बियाच्या नोवाक जोकोविचवर 2-6, 6-2, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर असूनही अल्काराझने जबरदस्त पुनरागमन केले आणि सलग तीन सेट जिंकून जेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयासह त्याने टेनिसमधील दिग्गज डॉन बज यांचा 88 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

सर्वात तरुण 'करिअर ग्रँड स्लॅम' विजेता
या विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कार्लोस अल्काराझ आता 'करिअर ग्रँड स्लॅम' पूर्ण करणारा इतिहासातील सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनला आहे. त्याने वयाच्या 22 वर्षे आणि 272 दिवसांत ही ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम डॉन बज यांच्या नावावर होता, ज्यांनी 22 वर्षे 363 दिवसांच्या वयात करिअर स्लॅम पूर्ण केला होता. जेव्हा एखादा खेळाडू आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन या चारही प्रमुख स्पर्धा जिंकतो, तेव्हा त्याला 'करिअर ग्रँड स्लॅम' म्हटले जाते.

हेही वाचा – India vs Pakistan : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानला 253 धावांचे लक्ष्य; कोण मारणार बाजी?

अल्काराझचा सुवर्णप्रवास
कार्लोस अल्काराझने यापूर्वी विम्बल्डन (2023, 2024), फ्रेंच ओपन (2024, 2025), यूएस ओपन (2022) आणि ऑस्ट्रेलियन ओपन (2026) जिंकले होते. या विजयासह अल्काराझने करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण केले आहे. कार्लोस अल्काराझ हा करिअर ग्रँड स्लॅम मिळवणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू आहे. या विजयासह अल्काराझ आता रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच, आंद्रे अगासी, रॉड लेव्हर, रॉय एमर्सन आणि डॉन बज यांसारख्या महान खेळाडूंच्या पंगतीत जाऊन बसला आहे. केवळ 22 व्या वर्षी गाठलेले हे शिखर टेनिसच्या नव्या युगाची नांदी मानले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number