T20 Cricket New World Record: क्रिकेट विश्वात खळबळ! एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स; इंडोनेशियाच्या गोलंदाजाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

इंडोनेशियाच्या 28 वर्षीय वेगवान गोलंदाज गेडे प्रियंदाना याने एकाच षटकात 5 फलंदाजांना तंबूत धाडून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.<br/>

T20 Cricket New World Record: क्रिकेट विश्वात खळबळ! एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स; इंडोनेशियाच्या गोलंदाजाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

T20 Cricket New World Record: आंतरराष्ट्रीय T-20 क्रिकेटमध्ये आजवर अनेक विक्रम झाले आणि मोडले, पण मंगळवारी इंडोनेशिया आणि कंबोडिया यांच्यातील सामन्यात जो चमत्कार घडला, तो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. इंडोनेशियाच्या 28 वर्षीय वेगवान गोलंदाज गेडे प्रियंदाना याने एकाच षटकात 5 फलंदाजांना तंबूत धाडून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

मलिंगा, राशिदचा रेकॉर्ड मोडीत

आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये आतापर्यंत लसिथ मलिंगा (श्रीलंका), राशिद खान (अफगाणिस्तान), जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) आणि कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) या चौघांनी एकाच षटकात 4 विकेट्स घेण्याची किमया केली होती. मात्र, एकाच षटकात 5 बळी घेणारा प्रियंदाना हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. ही कामगिरी पुरुष आणि महिला अशा दोन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांत पहिल्यांदाच घडली आहे.

हेही वाचा – England Ashes Series 2025 : रिसॉर्टमध्ये रात्र घालवल्या, खूप मद्यपान केलं…; मालिका पराभवानंतर इंग्लंड संघाच्या व्यवस्थापकाने केला मोठा खुलासा

दरम्यान, कंबोडियाचा संघ 168 धावांचा पाठलाग करत असताना 15 षटकांपर्यंत 5 बाद 106 अशा सुस्थितीत होता. मात्र, 16 व्या षटकात चेंडू हातात घेतलेल्या प्रियंदानाने सर्व समीकरणे बदलून टाकली. सलग 3 विकेट्स घेत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली. या संपूर्ण षटकात त्याने फक्त 1 धाव दिली (तीही वाईडमुळे) आणि कंबोडियाचा डाव संपुष्टात आणला. या कामगिरीमुळे इंडोनेशियाने सामना 60 धावांनी खिशात घातला.

हेही वाचा – Virat Kohli: विराट कोहलीच्या चाहत्यांचा हिरमोड! 'या' कारणामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार सामना

मिथुन आणि अल-अमिनच्या यादीत स्थान

आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विक्रम प्रथमच झाला असला तरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये यापूर्वी दोनदा अशी कामगिरी झाली होती. भारताच्या अभिमन्यू मिथुनने 2019-20 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आणि बांगलादेशच्या अल-अमिन हुसेनने 2013-14 मध्ये एका षटकात 5 बळी घेतले होते. आता गेडे प्रियंदानाने हा पराक्रम थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर करून दाखवला आहे. प्रियंदानाच्या गोलंदाजीच्या आधी इंडोनेशियाचा यष्टीरक्षक धर्मा केसुमा याने नाबाद 110 धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने 68 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने कंबोडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number