Triple Match Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! एकाच दिवशी टीम इंडियाचे 3 मोठे सामने; सकाळपासून रात्रीपर्यंत रंगणार थरार

यामध्ये वरिष्ठ पुरुषांचा अफगाणिस्तान विरुद्धचा देशांतर्गत दौरा, श्रीलंकेतील 'इंडिया ए' संघाची त्रिकोणीय मालिका आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेला आयसीसी (ICC) महिला टी-20 विश्वचषक यांचा समावेश आहे.

Triple Match Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! एकाच दिवशी टीम इंडियाचे 3 मोठे सामने; सकाळपासून रात्रीपर्यंत रंगणार थरार

Triple Match Schedule:  भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी 17 जून हा बुधवार अत्यंत उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाचा महाधमाका ठरणार आहे. सध्या भारतीय क्रिकेटचे विविध संघ वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये व्यस्त आहेत. यामध्ये वरिष्ठ पुरुषांचा अफगाणिस्तान विरुद्धचा देशांतर्गत दौरा, श्रीलंकेतील 'इंडिया ए' संघाची त्रिकोणीय मालिका आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेला आयसीसी (ICC) महिला टी-20 विश्वचषक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांना सकाळपासून ते थेट रात्री उशिरापर्यंत नॉन-स्टॉप क्रिकेट पाहता येणार आहे. कोणताही सामना चुकू नये म्हणून भारतीय वेळेनुसार सामन्यांचे अचूक वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

'इंडिया ए' वि. 'अफगाणिस्तान ए' 
क्रिकेटच्या या महावेळापत्रकाची सुरुवात सकाळी युवा खेळाडूंच्या सामन्याने होईल. कर्णधार टिळक वर्माच्या नेतृत्वाखालील 'इंडिया ए' संघ सध्या श्रीलंकेत 50 षटकांची त्रिकोणीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील भारताचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा साखळी सामना असेल. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला हरवले होते, परंतु दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. तिसरा सामना श्रीलंकेविरुद्ध टाय झाला आणि 'सुपर ओव्हर'मध्ये भारताला अपयश आले. त्यामुळे अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10:00 वाजता सुरू होईल आणि साधारणपणे संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत संपेल.

भारत वि. अफगाणिस्तान  
दिवसाचा दुसरा हाय-व्होल्टेज सामना दुपारी सुरू होईल, जिथे भारत आणि अफगाणिस्तानचे मुख्य संघ आमनेसामने येतील. दोन्ही देशांमधील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील हा दुसरा सामना आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. हा 50 षटकांचा सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल आणि रात्री 8:00 ते 8:30 वाजेपर्यंत सुरू राहील.

भारत वि. नेदरलँड्स (महिला टी-20 विश्वचषक)
दरम्यान, बुधवारच्या संध्याकाळी महिला ब्रिगेडचा थरार पाहायला मिळणार आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपला दुसरा सामना खेळेल. पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता नेदरलँड्सविरुद्धचा हा सामना संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. टी-20 फॉरमॅट असल्यामुळे हा सामना रात्री 10:30 च्या सुमारास संपेल.

हेही वाचा – Smriti Mandhana: स्मृती मानधनाची जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी; 'TIME' मासिकाच्या 100 प्रभावशाली खेळाडूंमध्ये मिळवलं स्थान

विशेष बाब म्हणजे, संध्याकाळी 7:00 ते रात्री 8:30 या दीड तासाच्या कालावधीत भारताचा पुरुष वरिष्ठ संघ आणि महिला संघ हे दोन्ही वेगवेगळ्या मैदानांवर एकाच वेळी खेळताना दिसतील. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे आता संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number