Abhishek Sharma: अभिषेक शर्माचा नादच खुळा; चेन्नईच्या गोलंदाजांना तावातावाने धुतले; अवघ्या 15 चेंडूत ऐतिहासिक अर्धशतक

अभिषेकने चेन्नईविरुद्ध अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. यासह तो सनरायझर्स हैदराबाद कडून सलामीवीर म्हणून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माचा नादच खुळा; चेन्नईच्या गोलंदाजांना तावातावाने धुतले; अवघ्या 15 चेंडूत ऐतिहासिक अर्धशतक

हैदराबाद: अभिषेक शर्मा याने शनिवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करत मोठा विक्रम त्याच्या नावावर केला आहे. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध शून्यावर बाद झालेला अभिषेक यावेळी वेगळ्याच अंदाजात मैदानात उतरला.

अभिषेकने चेन्नईविरुद्ध अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. यासह तो सनरायझर्स हैदराबाद कडून सलामीवीर म्हणून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम त्याच्याच नावावर होता. 2024 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात अभिषेकने 22 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 59 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली आणि संघाने सामना 10 धावांनी जिंकला.

या हंगामात अभिषेकची कामगिरी संमिश्र राहिली आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध तो 7 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने 48 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध तो शून्यावर बाद झाला. पंजाब किंग्स विरुद्ध त्याने 74 धावांची खेळी केली, तर राजस्थानविरुद्ध पुन्हा एकदा खाते न उघडताच माघारी परतला.

हेही वाचा: ED Raid: कोळसा घोटाळ्याप्रकरणी थेट उपायुक्तांच्या घरावर ईडीची धाड; केंद्रीय यंत्रणांच्या सलग कारवायांनी राजकारण तापले

आतापर्यंत 6 सामन्यांमध्ये अभिषेकने 31.33 च्या सरासरीने आणि 229.26 च्या स्ट्राईक रेटने 188 धावा केल्या आहेत. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तो यंदाच्या हंगामातील सर्वात धोकादायक सलामीवीरांपैकी एक मानला जात आहे.

अभिषेक शर्मा याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 83 सामने खेळले आहेत. 80 डावांत त्याने 27.45 च्या सरासरीने आणि 167.55 च्या स्ट्राईक रेटने 2004 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 11 अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 141 अशी आहे.

हेही वाचा: Strait Of Hormuz: 'फक्त खामेनेईंच्या आदेशानेच होर्मुज उघडणार, कोणाच्याही ट्विटवरील आदेशाने नाही'; इराणच्या 'त्या' ऑडिओ क्लिपमुळे अमेरिकेसह जगाची झोप उडाली

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number