IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आपले होम ग्राउंड बदलण्याच्या विचारात आहे. बेंगळुरूऐवजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियम हे नवे होम ग्राउंड असू शकते, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. एमसीएचे मानद सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले की, आरसीबी व्यवस्थापनाशी प्राथमिक चर्चा सुरू असून काही तांत्रिक बाबींवर निर्णय झाल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा होईल. त्यांनी स्पष्ट केले की, 'आरसीबी अजून काही पर्यायांचा विचार करत आहे. मात्र, पुणे हे विमानतळ, हॉटेल्स, मैदानाची क्षमता आणि चाहत्यांचा प्रतिसाद या दृष्टीने सर्वात योग्य ठिकाण ठरू शकते.'
हेही वाचा - Domestic Tournament: रोहित शर्मा 'या' देशांतर्गत स्पर्धेत खेळणार; तर विराट कोहलीला BCCI कडून कडक इशारा
आरसीबीच्या इतिहासातील पहिल्या आयपीएल विजयानंतर (3 जून 2025) झालेल्या विजयी सेलिब्रेशनमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे बेंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम वादात सापडले होते. त्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले होते. घटनेनंतर न्यायालयीन चौकशीत स्टेडियमला "मोठ्या कार्यक्रमांसाठी असुरक्षित" घोषित करण्यात आले. त्यामुळे, RCB नव्या ठिकाणाचा शोध घेत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - India vs South Africa : बीसीसीआयने भारत vs साऊथ अफ्रिका टेस्ट मॅचची वेळ बदलली, नेमकं कारण काय?
राज्य सरकारच्या चौकशीत RCB व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म आणि स्थानिक पोलिसांना या दुर्घटनेसाठी जबाबदार धरले गेले आहे. परिणामी, 2026 हंगामासाठी संघाने पुण्यातून आपले सामने खेळण्याची शक्यता वाढली आहे. एमसीए आणि आरसीबी यांच्यातील अंतिम करार डिसेंबर महिन्यात होऊ शकतो, कारण त्या सुमारासच खेळाडूंचा लिलाव होण्याची अपेक्षा आहे.