Tuesday, November 11, 2025 10:01:49 PM

T20 World Cup 2026: टी20 विश्वचषक 2026 साठी सर्व 20 संघ जाहीर! भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमानपद भूषवणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने जाहीर केले आहे की पुढील टी20 विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करतील.

t20 world cup 2026 टी20 विश्वचषक 2026 साठी सर्व 20 संघ जाहीर भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमानपद भूषवणार

T20 World Cup 2026: पुढील वर्षीचा म्हणजेच 2026 चा टी20 विश्वचषक क्रिकेट चाहत्यांसाठी नवी मेजवानी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने जाहीर केले आहे की पुढील टी20 विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करतील. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून सर्व संघांची नावे आता निश्चित झाली आहेत. या मेगा स्पर्धेत काही संघांनी आपले स्थान 2024 च्या टी20 विश्वचषकातील कामगिरीमुळे मिळवले, तर उर्वरित संघांनी पात्रता फेरीतून प्रवेश मिळवला. 15 ऑक्टोबर रोजी नेपाळ आणि ओमान यांनी आपले स्थान निश्चित केले होते. आता, 16 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) नेही पात्रता मिळवत शेवटचे स्थान निश्चित केले.

हेही वाचा - Commonwealth Games 2030 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारताची तयारी सुरू ; अहमदाबादला यजमानपदाची संधी ?

जपानवर विजय मिळवत युएईचा ऐतिहासिक प्रवेश

अल-अमेरात मैदानावर झालेल्या पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धेतील सुपर सिक्स सामन्यात युएईने जपानचा पराभव करून 2026 च्या विश्वचषकात स्थान निश्चित केले. जपानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 116 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, युएईने अलिशान शरफू आणि कर्णधार मोहम्मद वसीम यांच्या जबरदस्त सलामीमुळे फक्त 12.1 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह युएईने 2026 टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरणारा 20वा संघ म्हणून इतिहास रचला आहे.

2026 च्या टी20 विश्वचषकासाठी निश्चित झालेले सर्व 20 संघ - 
भारत
श्रीलंका
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
अफगाणिस्तान
बांगलादेश
यूएसए
वेस्ट इंडिज
आयर्लंड
न्यूझीलंड
पाकिस्तान
कॅनडा
इटली
नेदरलँड्स
नामिबिया
झिम्बाब्वे
नेपाळ
ओमान
यूएई

हेही वाचा - Harbhajan Singh: हरभजन सिंग अबू धाबी टी10 लीगमध्ये सामील! 'या' नवीन संघाचा भाग असणार

दरम्यान, 2026 चा टी20 विश्वचषक भारतीय भूमीवर आणि श्रीलंकेत खेळवला जाणार असून, स्पर्धा पूर्वीपेक्षा अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. नव्या संघांचा सहभाग स्पर्धेला अधिक स्पर्धात्मक आणि रोमांचक बनवणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री