Arjun Tendulkar IPL Debut: LSG कडून अर्जुन तेंडुलकरला अखेर IPL मध्ये पदार्पणाची संधी; इकाना स्टेडियमवर होणार गोलंदाजीची कसोटी

लखनौ सुपर जायंट्सने आज मोठा निर्णय घेत अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी दिली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन अनेक दिवसांपासून संधीच्या प्रतीक्षेत होता.

Arjun Tendulkar IPL Debut: LSG कडून अर्जुन तेंडुलकरला अखेर IPL मध्ये पदार्पणाची संधी; इकाना स्टेडियमवर होणार गोलंदाजीची कसोटी

Arjun Tendulkar IPL Debut: इंडियन प्रीमिअर लीग 2026 मध्ये आजचा सामना पंजाब किंग्ससाठी अत्यंत निर्णायक ठरत आहे. प्ले-ऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी पंजाबला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं गरजेचं आहे. सलग दमदार सुरुवात केल्यानंतर पंजाबची गाडी अचानक रुळावरून घसरली आणि मागील सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने संघ अडचणीत सापडला आहे.

दरम्यान, पंजाबची फलंदाजी संपूर्ण हंगामात प्रभावी ठरली असली, तरी गोलंदाजांची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली नाही. त्यामुळे अनेक सामने हातातून निसटले. आजच्या सामन्यात विजय मिळवूनही पंजाबला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत होणं पंजाबसाठी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अशी समीकरणं जुळल्यास पंजाब 15 गुणांसह प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकतो.

अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी
तथापी, लखनौ सुपर जायंट्सने आज मोठा निर्णय घेत अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी दिली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन अनेक दिवसांपासून संधीच्या प्रतीक्षेत होता. अखेर आज त्याचं IPL 2026 मध्ये मैदानावर उतरण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. इकाना स्टेडियमवर पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ आणि पंजाब यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारी पाहिली तर पंजाबकडे 4-3 अशी किरकोळ आघाडी आहे. इकाना स्टेडियमवरही पंजाबने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.

लखनौ सुपर जायंट्सच्या संघात जोश इंग्लिस, अर्शीन कुलकर्णी, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत, अब्दुल समद, मुकुल चौधरी, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि मोहसीन खान यांचा समावेश आहे. तर पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को यान्सेन, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा – FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक 2026 अखेर भारतात प्रसारित होणार; प्रसारण हक्कांचा करार अंतिम टप्प्यात

अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकिर्द  
अर्जुन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 24 सामन्यांत 52 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 685 धावाही केल्या असून त्यात एका शतकासह दोन अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्येही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. याआधी IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याने पाच सामने खेळत तीन विकेट्स घेतल्या होत्या.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number