दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये एशिया कप 2025 चा महामुकाबला होणार आहे. या स्पर्धेतील आधीच्या दोन्ही सामन्यांत भारताने पाकिस्तानवर प्रभावी विजय नोंदवला आहे. परंतु अचानक पाऊस किंवा अन्य कारणांनी सामना रद्द झाला तर काय होईल?हे अनेक चाहते आणि तज्ञांना जाणून घ्यायचे आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेनं (ACC) राखीव दिवस म्हणून पुढील सोमवारी, म्हणजेच 29 सप्टेंबरला सामना पुन्हा आयोजित करण्याची व्यवस्था केली आहे. म्हणजेच आजचा सामना हवामानामुळे रद्द झाला तर तो सोमवारी खेळला जाईल. मात्र त्या दिवशीही जर हवामानबाधा आली तर कोणत्याही प्रकारे खेळ होणार नसेल तर स्पर्धेचा अंतिम निकाल दोन्ही संघांमध्ये विभागून जाहीर केला जाईल, म्हणजे चषक सामायिक केला जाईल. अश्याप्रकारे चषक दोन्ही संघांना देण्याची घटना एशिया कपच्या इतिहासात प्रथमच होऊ शकते, कारण आतापर्यंत अशी बाब घडलेली नाही.
दुबईचा तापमान आणि हवामानही आजच्या सामन्यावर प्रभाव पाडू शकते; उदा. ताज्या अहवालांमध्ये याठिकाणी उकाड्याचे तापमान नोंदले गेले आहे, ज्यामुळे खेळाडूंना शारीरिक आव्हानाला सामोरे जावे लागेल.
भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये आहे तर पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी हा वेगवान गोलंदाज यावेळी महत्वाचा ठरू शकतो. आज काय होतंय हे पाहणे महत्वाचे ठरेल.