Asia Cup 2026: भारतीय क्रिकेट पुरुष संघासह महिला संघाची देखील पुनरावृत्ती, सामना जिंकूनही विजेतेपद स्वीकारण्यास मनाई!

पुरुषांच्या पाठोपाठ महिलांनीही आशिया कप जिंकत क्रिकेटविश्वात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा तब्बल 72 धावांनी दणदणीत

Asia Cup 2026: भारतीय क्रिकेट पुरुष संघासह महिला संघाची देखील पुनरावृत्ती, सामना जिंकूनही विजेतेपद स्वीकारण्यास मनाई!

पुरुषांच्या पाठोपाठ महिलांनीही आशिया कप जिंकत क्रिकेटविश्वात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा तब्बल 72 धावांनी दणदणीत पराभव करून भारतीय महिला संघाने विजेतेपदावर आपला ठसा उमटवला. हा विजय केवळ धावांचा नव्हता, तर संपूर्ण स्पर्धेत दाखवलेल्या वर्चस्वाचा पुरावा होता. मात्र या दिमाखदार विजयानंतरही दुबईच्या मैदानात महिला संघाने विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारली नाही. ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी न घेण्याचा निर्धार करत त्या रिकाम्या हाताने पण अभिमानाने मायदेशी परतणार आहेत.

आशिया कप जिंकला, पण ट्रॉफी तिथेच!
13 सप्टेंबरला महिला आशिया कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत विजेतेपद पटकावले. पण बक्षीस वितरण समारंभात भारतीय संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिला. ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी पुरुष संघानेही सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात हाच निर्णय घेतला होता. त्यामुळे दोन्ही आशिया कपच्या ट्रॉफी अजूनही भारतात आलेल्या नाहीत.

नेमके कारण काय?
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याची ठाम भूमिका भारतीय संघाने घेतली. विशेष म्हणजे हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता, तर BCCI ने याबाबत नक्वींना आधीच स्पष्ट कल्पना दिली होती.आता दोन्ही आशिया कपच्या ट्रॉफी भारतात परत आणण्यासाठी BCCI ने तयारी सुरू केली आहे. BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी दोन्ही ट्रॉफी लवकरच भारतात येतील, अशी माहिती दिली असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Asia Cup Trophy : सर्व साखरझोपेत असताना स्टेडियममध्ये हायव्होल्टेज ड्रामा! 40 मिनिटं ताटकळत ठेवलं, ट्रॉफी वितरणात नक्वीनी तमाशा केलाच

BCCI सचिव काय म्हणाले? 
BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी भारतीय संघाच्या ट्रॉफी न घेण्याच्या निर्णयाचा संबंध पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली देण्याशी जोडला आहे. सैकिया म्हणाले, "आम्ही बक्षीस समारंभात सहभागी न होऊन पहलगाम हल्ल्यातील पीडितांना आदरांजली  वाहिली आहे. मी खात्री देतो की, केवळ महिला आशिया कपचीच नाही, तर पुरुष आशिया कपची ट्रॉफीही आम्ही लवकरच भारतात परत आणू." याआधी BCCI ने दोन्ही ट्रॉफी भारतात आणण्यासाठी ACC कडे पत्रव्यवहार सुरू केल्याची माहिती मिळाली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number