Asia Cup Trophy: यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले, मात्र ट्रॉफी हस्तांतरणाच्या वेळी अनपेक्षित वाद निर्माण झाला. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने गोंधळ उडाला. परिणामी, ट्रॉफी एसीसीच्या मुख्यालयात ठेवण्यात आली असून अद्याप ती भारताकडे अद्याप पोहोचलेली नाही.
बीसीसीआयची कठोर भूमिका
बीसीसीआयने आता या प्रकरणात कठोर भूमिका घेत नक्वींना ईमेल पाठवला आहे. या ईमेलमध्ये बीसीसीआयने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, 'आशिया कप विजेत्या टीम इंडियाला योग्य सन्मान मिळायला हवा. ट्रॉफी तातडीने भारताकडे सुपूर्द करावी, अन्यथा हे प्रकरण आम्ही आयसीसीकडे नेऊ.' बीसीसीआयने असेही नमूद केले की, या वादामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मर्यादा आणि परंपरा धोक्यात येत आहेत.
हेही वाचा - Rishabh Pant Appointed Captain: BCCI चा मोठा निर्णय! ऋषभ पंतची कर्णधार पदी निवड; शुभमन गिलला वगळले
फायनल सामन्यानंतर मोहसिन नक्वी स्वतः ट्रॉफी सादर करण्यासाठी मंचावर आले होते. मात्र, समारंभाचे सूत्रसंचालक सायमन डौल यांनी सांगितले की भारतीय संघ नक्वींकडून पुरस्कार स्वीकारणार नाही. टीम इंडियाने इतर एसीसी अधिकाऱ्याकडून ट्रॉफी घ्यायची तयारी दर्शवली होती, परंतु नक्वी यांनी स्वतः सादरीकरणावर आग्रह धरला. या वादामुळे संपूर्ण समारंभ रद्द झाला आणि नक्वी स्टेजवरून निघून जाताना ट्रॉफी आणि पदके घेऊन गेले.
हेही वाचा - Daniel Naroditsky: जगप्रसिद्ध अमेरिकन बुद्धिबळपटूचा 29 व्या वर्षी आकस्मिक मृत्यू, बुद्धिबळ जगतात पसरली शोककळा
भारत-पाक खेळाडूंमध्ये तणाव
स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले, तर पाकिस्तानी खेळाडूंकडून ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचे हावभाव करण्यात आले. 2025 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले. परंतु, टीम इंडियाने तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला. दरम्यान, बीसीसीआयच्या या इशाऱ्यानंतर आता एसीसी आणि पीसीबी यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.