महिला खेळाडूंची सुवर्ण कामगिरी; भारताने आशियाई खेळात नेमबाजीत जागतिक विक्रमासह पटकावले सुवर्णपदक

भारताने महिलांच्या कंपाऊंड नेमबाजी प्रकारात जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
asian games 2026
asian games 2026

Asian Games 2026 : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये बुधवारी भारताच्या महिला कंपाऊंड नेमबाजी संघाने चीनविरुद्ध सनसनाटी कामगिरी करत विश्वविक्रमाची बरोबरी साधत सुवर्णपदक पटकावले. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप या भारतीय त्रिकुटाने अंतिम सामन्यान चीनला 238-234 ने पराभूत केले. त्यांच्या या गुणांनी दक्षिण कोरियाने प्रस्थापित केलेल्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. भारताने पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आणि संपूर्ण सामन्यात ती टिकवून ठेवली. या विजयामुळे ज्योतीला तिचे चौथे आशियाई क्रीडा सुवर्णपदक मिळाले, तर चिकिता आणि पृथिका यांनी आपल्या पहिल्याच स्पर्धेत पहिले आशियाई सुवर्णपदक पटकावले.

चीनच्या वुनियर, युए वांग आणि फांगयाओ वेई यांनी रौप्य पदकावर समाधान मानले. भारताने यापूर्वी ओकाझाकी चुओ सोगो पार्क येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियावर 234-233 असा निसटता विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे सातवे सुवर्णपदक असून, यासोबतच देशाच्या पदकांची संख्या 53 झाली आहे. ज्यात 21 रौप्य आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, स्क्वॉशमध्ये भारतीय महिला संघाने सिंगापूरला 2-0 ने पराभूत करून देशाचे किमान कांस्यपदक निश्चित केले. महिलांच्या केरीनमध्ये, सरिता कुमारी आणि कीर्ती रंगस्वामी चिक्का यांनी हीटमध्ये स्पर्धा केल्यानंतर रेपचेज फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या स्प्रिंटमध्ये, रोनाल्डो सिंग (15वे) आणि डेव्हिड बेकहॅम (14वे) यांनी पात्रता फेरीतून पुढे जात 16 जणांच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version