Asian Games: भारताच्या लेकीनं मारली बाजी! 400 मीटरचा टप्पा 53.21 सेकंदात पार करत कांस्यपदकावर कोरले नाव

Asian Games: भारताच्या लेकीनं मारली बाजी! 400 मीटरचा टप्पा 53.21 सेकंदात पार करत कांस्यपदकावर कोरले नाव
Prachi Chaudhary Won Bronze medal

आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावत आहेत. भारतीय कबड्डीच्या दोन्ही महिला आणि पुरुष संघानंतर आता एका भारतीय लेकीने देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 29 वर्षीय धावपटू प्राची चौधरी हिने महिलांच्या 400 मीटरच्या अंतिम शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे. प्राचीने ही शर्यत 53.21 सेकंदात पूर्ण केली. या पदकासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची एकूण पदकसंख्या आता 30 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.

याआधीची दमदार कामगिरी
या कांस्यपदकासह प्राचीच्या नावावर आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरे पदक जमा झाले आहे. यापूर्वी तिने 2023 च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 4×400 मीटर रिले संघासोबत रौप्यपदक जिंकले होते.

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाची सुवर्णपदकावर मोहोर; अंतिम सामन्यात इराणचा 40-34 ने पराभव

अखेरच्या 50 मीटरमध्ये आणि 0.17 सेकंदाच्या फरकाने मारली बाजी
प्राचीने अखेरच्या 50 मीटरमध्ये जीवाचं रान लावत दक्षिण कोरियाच्या किम सेयूनला मागे टाकले. किमने 53.28 सेकंदाची वेळ नोंदवत चौथे स्थान मिळवले. दोघींमध्ये फक्त 0.17 सेकंदाचे अंतर राहिले.

विशेष म्हणजे, प्राचीची 53.21 सेकंदाची ही वेळ तिच्या यंदाच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा कमी आहे. तिने ऑगस्ट 2026 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या World Athletics Continental Tour Silver स्पर्धेत 52.57 सेकंदाची वेळ नोंदवली होती. तर तिची 400 मीटरमधील वैयक्तिक सर्वोत्तम वेळ 52.40 सेकंद असून तिने ही कामगिरी 2023 मध्ये केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version