Cricket Match Fixing: क्रिकेटविश्वात खळबळ! मॅच फिक्सिंगप्रकरणी चार खेळाडूंविरोधात FIR, नेमकं प्रकरण काय?

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे गंभीर प्रकरण उघड झाले असून, आसाम क्रिकेट असोसिएशनने चार खेळाडूंना निलंबित केले आहे.

Cricket Match Fixing: क्रिकेटविश्वात खळबळ! मॅच फिक्सिंगप्रकरणी चार खेळाडूंविरोधात FIR, नेमकं प्रकरण काय?

आसाम: क्रिकेट खेळाच्या नियमांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यावेळी हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्हे, तर देशांतर्गत स्पर्धांपर्यंत पोहोचल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणात कठोर पाऊल उचलत चार खेळाडूंना तात्काळ निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकूर यांचा समावेश आहे.

आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव सनातन दास यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, या खेळाडूंवर क्रिकेटमधील भ्रष्ट कारवायांमध्ये सहभागी असल्याचे गंभीर आरोप आहेत. ही बाब सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 शी संबंधित असून, काही खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि त्यांना चुकीच्या मार्गाने प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या चौघांवर आहे. आरोप समोर येताच बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटने तातडीने चौकशी सुरू केली. त्याचबरोबर आसाम क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणात फौजदारी कारवाईही सुरू केली आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: "देवेंद्र फडणीस यांना चेकमेट करण्यासाठी शिंदेंना जवळ करतायेत अमित शाह" संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

मॅच फिक्सिंगप्रकरणी आसाम क्रिकेट असोसिएशनने गुवाहाटी गुन्हे शाखेत या चार खेळाडूंविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. क्रिकेटमधील शिस्त आणि पारदर्शकता राखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश यामधून देण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना कठोर इशारा दिला असून, भ्रष्टाचाराला अजिबात थारा दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये नाव असलेल्या चार खेळाडूंपैकी एकही खेळाडू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 साठी आसाम संघाचा सदस्य नव्हता. या स्पर्धेत आसाम संघ एलिट ग्रुप ए मध्ये सहभागी होता आणि संघाने सात सामन्यांत तीन विजयांसह गटात सातवे स्थान मिळवले होते. भारतीय स्टार क्रिकेटपटू रियान परागही या संघाचा भाग होता.

निलंबनाच्या कालावधीत या चार खेळाडूंना क्रिकेटशी संबंधित कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. खेळाडू, प्रशिक्षक, पंच किंवा मॅच रेफरी अशा कोणत्याही भूमिकेत काम करता येणार नाही. आसाम क्रिकेट असोसिएशनने 12 डिसेंबर रोजी अधिकृतपणे एफआयआर दाखल करत या प्रकरणात भूमिका स्पष्ट केली असून, देशांतर्गत क्रिकेट स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Gold-Silver Price Today : सोने-चांदी दरात भूकंप! शिखरावर पोहचलेला उच्चांक पत्त्यांसारखा कोसळला; जाणून घ्या आजचे दर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number