Wednesday, November 19, 2025 01:19:44 PM

IND vs AUS 3rd ODI: रोहित आणि कोहलीसमोर ऑस्ट्रेलियाची शरणागती! सिडनीमध्ये भारताने जिंकली एकदिवसीय मालिका

रोहित शर्मा ने नाबाद 121 धावा केल्या, तर विराट कोहली ने 74 धावांवर नाबाद राहून टीमला विजयात महत्त्वाची साथ दिली. या विजयासह शुभमन गिलचा कर्णधार म्हणून पहिला विजयही नोंदवला गेला.

ind vs aus 3rd odi रोहित आणि कोहलीसमोर ऑस्ट्रेलियाची शरणागती सिडनीमध्ये भारताने जिंकली एकदिवसीय मालिका

IND vs AUS 3rd ODI: सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेटने पराभव केला. रोहित शर्मा ने नाबाद 121 धावा केल्या, तर विराट कोहली ने 74 धावांवर नाबाद राहून टीमला विजयात महत्त्वाची साथ दिली. या विजयासह शुभमन गिलचा कर्णधार म्हणून पहिला विजयही नोंदवला गेला.

भारतीय गोलंदाजांची दमदार खेळी

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ फक्त 236 धावांवर ऑलआउट झाला. भारतीय गोलंदाजांमध्ये हर्षित राणा ने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम एकदिवसीय कामगिरी ठरली.

हेही वाचा - India vs Australia: विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात रचला नवा इतिहास! 'ही' कामगिरी करत मोडला इयान बोथमचा विक्रम

विराट-रोहितची दमदार भागीदारी 

भारताने 237 धावांचे लक्ष्य सहजपणे पूर्ण केले. शुभमन गिल फक्त 24 धावांवर बाद झाला, परंतु विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मिळून टीमला विजय मिळवून दिला. रोहित शर्माचे हे 33 वे एकदिवसीय शतक आणि 50 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची नाबाद भागीदारी केली.

हेही वाचा - Australian Women Cricketers Molested: इंदूरमध्ये दोन महिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसोबत गैरवर्तन! आरोपीला अटक

शुभमन गिलचा कर्णधार म्हणून पहिला विजय

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शुभमन गिल यांची नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती झाली होती. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून त्यांनी त्याबाबतचा पहिला लक्षणीय टप्पा पार केला.  
 


सम्बन्धित सामग्री