मुंबई: क्रिक्रेटचा देव ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर त्याच्या उकृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. आतापर्यंत एक दिवसीय सामन्यात 10 हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर जगातील पहिला क्रिक्रेटपटू ठरला. इतकंच नाही, तर त्याचा विक्रम अनेक वर्षे टिकून राहिला. अशातच, ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटपटू मायकल हसीने सचिन तेंडुलकरबाबत एक वक्तव्य केले. मयकल हसी म्हणाला की, 'जर मला क्रिक्रेटमध्ये लवकर पदार्पण करण्याची संधी मिळाली असती, तर आपण सचिन तेंडुलकरपेक्षा 5000 पेक्षा अधिक धावा केल्या असत्या'.
नेमकं प्रकरण काय?
ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटपटू मायकल हसीने बुधवारी द ग्रेड क्रिक्रेटर यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यादरम्यान, मायकल हसी म्हणाला की, 'माझ्या काळात ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते. त्यामुळे, मला क्रिक्रेटविश्वात पदार्पण करायला उशीर झाला. पण, जर क्रिक्रेटमध्ये मला लवकर पदार्पण करण्याची संधी मिळाली असती, तर मी सचिन तेंडुलकरपेक्षा 5000 पेक्षा अधिक धावा केलो असतो'.
पुढे, मायकल हसी म्हणाला की, 'जर मला लवकर पदार्पण करण्याची संधी मिळाली असती, तर मी सर्वाधिक शतके, सर्वात जास्त विजय आणि सर्वात जास्त विश्वचषक विजय, कदाचित हे सर्वकाही मिळवलं असतं. पण, दुर्दैवाने, जेव्हा मी सकाळी उठतो, तेव्हा मला जाणवतं की, हे फक्त एक स्वप्न आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटसाठी जेव्हा माझी निवड झाली, तेव्हा माझ्या खेळाची समज अधिक चांगली होती, हे माझं भाग्य'.
हेही वाचा: Asia Cup 2025: आशिया कप ट्रॉफी वादाला नवीन वळण; मोहसिन नक्वींचा BCCI ला थेट इशारा, म्हणाले ‘ट्रॉफी हवी असेल तर…’
मायकल हसी कोण आहे?
मायकल हसी हा माजी ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटपटू आहे. मायकल हसी 'मिस्टर क्रिक्रेटर'च्या नावाने ओळखला जातो. 2004 मध्ये मायकल हसीने क्रिक्रेटविश्वात पदार्पण केले आणि 2013 मध्ये क्रिक्रेटमधून संन्यास घेतले. इतकंच नाही, तर हसीने 302 मॅचमध्ये 12 हजार 398 धावा केले, ज्यात 79 टेस्ट मॅच आणि 185 एक दिवसीय मॅचचा समावेश आहे.