सध्या सर्व क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2026 ची उत्सुकता लागली आहे. इंडियन प्रीमियर लीग 26 मार्च 2026 ते 31 मे 2026 दरम्यान होणार असून याचे मिनी ऑक्शन डिसेंबर 2025 मध्ये पार पडले. मात्र त्यापुर्वी आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या संघावर टीकेची झोड पडत आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील लिलावादरम्यान अभिनेता शाहरुख खानने त्याच्या कोलकाता नाइट रायडर्स संघात मुस्तफिजूर रहमानल या बांगलादेशी वेगवान गोलंदाजाला सामील होते, मात्र आता बीसीसीआयने अधिकृतपणे केकेआरला मुस्तिफिझुर रहमानला संघाबाहेर करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी केकेआर संघाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, “कोलकाता नाईट रायडर्सने पुष्टी केली आहे की आयपीएलचे नियामक म्हणून बीसीसीआयने आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामापूर्वी मुस्तफिजूर रहमानला संघातून काढण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूचनेनुसार, योग्य प्रक्रिया आणि सल्लामसलत केल्यानंतर ही हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआय आयपीएलच्या नियमांनुसार कोलकाता नाईट रायडर्सला बदली खेळाडूची परवानगी देईल आणि अधिक तपशील योग्य वेळी कळवला जाईल.” त्यामुळे मुस्तिफिझुर रहमानला संघाबाहेर केल्यानंतर केकेआरकडे आता त्याची जागा भरून काढण्यासाठी एका खेळाडूला संधी देईल. यामुळे एका खेळाडूचं नशिब पालटणार हे मात्र नक्की आहे. फॉर्म आणि संघाला फायदा होणाऱ्या कोणत्या खेळाडूची केकेआर निवड करेल हे देखील पाहण तितकचं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुस्तिफिझुर रहमानला संघाबाहेर काढण्यामागचं कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू तरुणांना लक्ष्य केले जात आहे. 18 डिसेंबर 2025 रोजी दीपू चंद्र दास या भारतीय तरुणाला जाळून संपवण्यात आलं. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात होता. अशातच शाहरुख खानने त्याच्या केकेआर या संघात एका बांगलादेशी खेळाडूला सामील केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 16 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या आयपीएल लिलावात शाहरुख खानच्या केकेआर संघाने बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमान याला 9 कोटींमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्यानंतर राजकारणी आणि धर्मगुरूंनी शाहरुख खानला चांगलचं निशाण्यावर ठेवल. केकेआर फ्रँचाइजीचे सहमालक शाहरुख खआनसह अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहतासुद्धा आहे. या संघात शाहरुखची 55 टक्के आणि जुही चावला, जय मेहता यांची 45 टक्के भागीदारी आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाने 2012, 2014 आणि 2024 या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या संघातील अचानक बदलांमुळे संघाची खेळी कशी असणार ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे.