Lanka Premier League: लंका प्रीमियर लीगच्या वेळापत्रकाबाबत मोठी बातमी! टी-20 विश्वचषक तयारीमुळे स्पर्धा 7 महिन्यांनी पुढे ढकलली

एलपीएलचा सहावा हंगाम मूळ वेळापत्रकापेक्षा सात महिन्यांनी पुढे ढकलण्यात येत असून आता ही स्पर्धा 8 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत खेळवली जाईल.

Lanka Premier League: लंका प्रीमियर लीगच्या वेळापत्रकाबाबत मोठी बातमी! टी-20 विश्वचषक तयारीमुळे स्पर्धा 7 महिन्यांनी पुढे ढकलली

Lanka Premier League: श्रीलंकेतील लोकप्रिय लंका प्रीमियर लीग (LPL) बाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट (SLC) ने 1 डिसेंबर रोजी जाहीर केले की एलपीएलचा सहावा हंगाम मूळ वेळापत्रकापेक्षा सात महिन्यांनी पुढे ढकलण्यात येत असून आता ही स्पर्धा 8 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत खेळवली जाईल. ही टी-20 लीग याआधी डिसेंबर 2025 मध्ये आयोजित होणार होती.

टी-20 विश्वचषक 2026 मुळे पुढे ढकलण्यात आली स्पर्धा –  

एलपीएलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 ची तयारी. भारत आणि श्रीलंका फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान संयुक्तपणे या जागतिक स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणारी पायाभूत सुविधा, स्टेडियम दुरुस्ती आणि गुणवत्ता उंचावण्याच्या गरजेमुळे श्रीलंका क्रिकेटने सर्व शक्ती विश्वचषकाच्या तयारीत केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – BCCI Board Meeting: BCCI ने अचानक बोलावली बैठक! गौतम गंभीर आणि आगरकर यांच्याशी करणार चर्चा; काय आहे नेमकं प्रकरण?

विश्वचषक सामने श्रीलंकेतील तीन स्टेडियममध्ये आयोजित केले जातील: कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम, सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड आणि कॅंडीमधील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. या 3 ही मैदानांची नव्याने उभारणी, नूतनीकरण आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सज्जता ही प्राथमिकता ठरणार आहे.

हेही वाचा – Palash Muchhal Video: स्मृती मानधनासोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर पहिल्यांदाच विमानतळावर स्पॉट झाला पलाश मुच्छल; पापाराझींच्या प्रश्नांकडे केलं दुर्लक्ष

एलपीएलचा हंगाम यंदा होणार नाही

एलपीएल ही श्रीलंकेची सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वोत्तम स्थानिक टी-20 लीग मानली जाते. पाच संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा 2020 पासून सातत्याने होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंमुळे या लीगची लोकप्रियता वर्षागणिक वाढत चालली आहे. लीगचा पहिला हंगाम 2020 मध्ये खेळवण्यात आला. तसेच 1 ते 21 जुलै 2024 मध्ये  शेवटचा हंगाम पार पडला. गेल्या 5 वर्षांत पहिल्यांदाच एलपीएलचा हंगाम दरवर्षीप्रमाणे होणार नाही, यामुळे चाहत्यांमध्ये काहीशी निराशा आहे. मात्र विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनासाठी हा मोठा बदल करण्यात आला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number