IPL 2026 Schedule: IPL च्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट; पहिल्या 20 दिवसांचे शेड्युल ‘या’ दिवशी होणार जाहीर

देशातील काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि आयपीएलच्या तारखा एकाच वेळी येत असल्याने वेळापत्रक निश्चित करताना बीसीसीआय सावध पवित्रा घेत आहे.

IPL 2026 Schedule: IPL च्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट; पहिल्या 20 दिवसांचे शेड्युल ‘या’ दिवशी होणार जाहीर

IPL 2026 Schedule: जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या आगामी हंगामाबाबत बीसीसीआयने महत्त्वाची माहिती दिली आहे. आयपीएलच्या पहिल्या 20 दिवसांचे वेळापत्रक पुढील दोन ते तीन दिवसांत जाहीर केले जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव देवजित लोन सैकिया यांनी केली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

निवडणुकांच्या तारखांचा विचार करून निर्णय
देशातील काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि आयपीएलच्या तारखा एकाच वेळी येत असल्याने वेळापत्रक निश्चित करताना बीसीसीआय सावध पवित्रा घेत आहे. “ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तिथल्या तारखांचा आम्ही सखोल विचार करत आहोत. सुरक्षेचा प्रश्न आणि स्थानिक प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेऊनच वेळापत्रक तयार केले जात आहे,” असे सैकिया यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Cricket News : मोठी बातमी समोर! 28 वर्षांची प्रतीक्षा संपवणाऱ्या ‘त्या’ दिग्गजावर आता मोठी जबाबदारी

दोन टप्प्यात येणार वेळापत्रक
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआय संपूर्ण हंगामाचे वेळापत्रक एकदाच जाहीर न करता ते टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या 20 दिवसांच्या वेळापत्रकानंतर, निवडणुकांचा नेमका कार्यक्रम स्पष्ट झाल्यावर उर्वरित सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा केली जाईल. यामुळे चाहत्यांना आणि फ्रँचायझींना सुरुवातीच्या सामन्यांचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number