Friday, December 05, 2025 02:02:03 AM

Bangladesh Cricket : 'माझ्या जवळ आला आणि...'; बांगलादेशच्या माजी महिला कर्णधाराचा निवडकर्त्यावर आरोप

राष्ट्रीय संघाच्या माजी कर्णधार जहानारा आलम हिने माजी मुख्य निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

bangladesh cricket  माझ्या जवळ आला आणि बांगलादेशच्या माजी महिला कर्णधाराचा निवडकर्त्यावर आरोप

Jahanara Alam Allegations: बांगलादेशच्या महिला क्रिकेट विश्वात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. राष्ट्रीय संघाच्या माजी कर्णधार जहानारा आलम हिने माजी मुख्य निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापक मंजरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डात (BCB) खळबळ उडाली असून, मंडळाने तात्काळ चौकशी समिती नेमली आहे.

बीसीबीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, महिला क्रिकेट संघाच्या एका माजी सदस्याने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. प्रकरणाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन, एक विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली असून ती 15 कामकाजाच्या दिवसांत निष्कर्ष आणि शिफारसी सादर करणार आहे. बोर्डाने पुढे स्पष्ट केले की, बीसीबी सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्यास वचनबद्ध आहे. तपासानंतर दोषी आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा - IND vs PAK Hong Kong Sixes: भारत विरुद्ध पाकिस्तान हाँगकाँग सिक्स सामना सुरू; पाकिस्तानने जिंकली नाणेफेक

आरोप काय आहेत?

पत्रकार रियासाद अझीम यांना दिलेल्या मुलाखतीत जहानारा आलमने सांगितले की, मंजरुल इस्लाम तिच्याशी अनुचित वर्तन करत असत. तिच्या परवानगीशिवाय तो तिच्या खांद्यावर हात ठेवत असे, तसेच वैयक्तिक टिप्पणी आणि अयोग्य स्पर्शामुळे ती अस्वस्थ होत असे. एवढेच नव्हे तर संघातील इतर सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतही तो तिच्याशी हस्तांदोलनाऐवजी मिठी मारण्याचा प्रयत्न करायचा, असेही जहानाराने सांगितले. जहानारा म्हणाली की, तिने या सर्व घटनांबद्दल बीसीबीचे माजी संचालक शफिउल इस्लाम नाडेल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांच्याकडे औपचारिक तक्रार केली होती.

हेही वाचा - IND vs AUS 4th T20I : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; मालिकेत 2-1 ने आघाडीवर

जहानारा आलमचा क्रिकेट प्रवास

जहानारा आलम ही बांगलादेशची सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असून, ती भारताच्या महिला T20 चॅलेंज आणि FairBreak Invitational T20 सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणारी एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे. तिने 52 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48 बळी घेतले असून तिचा सरासरी बॉलिंग रेट 30.39 आहे. तसेच, 83 टी-20 सामन्यांमध्ये तिने 60 बळी घेतले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीनंतर बीसीबीकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


सम्बन्धित सामग्री