German Model Lizlaz on Virat Kohli : किंग कोहलीच्या लाईकमुळे चर्चेत आलेल्या मॉडेलचा खळबळजनक खुलासा

गेल्या काही दिवसांपूर्वी किंग कोहलीने एका जर्मन रीलस्टार लिझलाझ हिच्या इन्स्टाग्राम रीलला लाईक केलं होतं. त्यानंतर लिझलाझ एका रात्रीत स्टार झाली होती. अशातच लिझलाझने नुकतचं एक वक्तव्य केलं आहे.

German Model Lizlaz on Virat Kohli :  किंग कोहलीच्या लाईकमुळे चर्चेत आलेल्या मॉडेलचा खळबळजनक खुलासा

गेल्या काही दिवसांपूर्वी किंग कोहलीने एका जर्मन रीलस्टार लिझलाझ हिच्या इन्स्टाग्राम रीलला लाईक केलं होतं. त्याच्या या एका लाईकने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर लिझलाझ एका रात्रीत स्टार झाली होती. जर्मनची मॉडेल लिझलाझ हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोलोअर्सचा पाऊस पडला होता. अशातच लिझलाझने नुकतचं एक वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी त्याच्या विरोधात बोलून त्याची नाच्चकी करण्यासाठी काही लोकांनी तिला पैशांची ऑफर दिली होती. 

हेही वाचा- IPL 2026: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर काँग्रेस नेत्याची IPL बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

तिच्या या खुलासानंतर तिने दिलेली ही मुलाखत अवघ्या काही वेळातच व्हायरलदेखील झाली. ‘Filmy Mantra’ ला दिलेल्या मुलाखतीत, लिझलॅझने असा खुलासा केला की, “त्या गोष्टीमुळे मला खूप आनंद झाला होता आणि मी थोडी भावूकही झाले होते. पण एवढं सगळं घडेल, याची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. विविध मासिकं आणि माध्यमांकडून मला सतत फोन येऊ लागले.

काही लोक तर मला जबरदस्तीने अशा गोष्टी बोलायला लावत होते, ज्या मला बोलायच्याच नव्हत्या. काही पत्रकारांनी तर विराट कोहलीबद्दल वाईट बोलण्यासाठी आणि त्याने कधीच न केलेल्या गोष्टींचे आरोप करण्यासाठी मला पैशांची ऑफरही दिली. पण मी असं का करेन? मी स्वतः सांगितलं होतं की विराट माझा आवडता क्रिकेटपटू आहे. मग पैशांसाठी मी त्याच्याबद्दल चुकीचं का बोलू? मी तशी व्यक्ती नाही.”

हेही वाचा- DC VS PBKS IPL 2026 : मिलर, अक्षर आणि आशुतोषच्या दमदार खेळीने दिल्ली कॅपिट्ल्सची पंजाब संघावर मात; DC चा 3 गडी राखून विजय

जगातील सर्वाधिक फॉलो केला जाणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली अग्रस्थानी असून इन्स्टाग्रामवर त्याचे 273 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याच्या चाहतावर्ग देशापुरता मर्यादीत नसून जगभर पसरला आहे. विराट कोहली सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी त्याच्या प्रत्येक हालचालीवर चाहत्यांचं बारकाईने लक्ष असतं. अशातच लिझलॅझने  ‘Filmy Mantra’ ला दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number