मॅरेथॉन 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

'सेखों इंडियन एअरफोर्स मॅराथॉन 2026' मध्ये सहभागी होणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे दोन विशेष सेवा चालवणार असल्याची माहिती अधिकृत निवेदनानुसार देण्यात आली.
sekhon indian airforce marathon 2026
sekhon indian airforce marathon 2026

‘सेखों इंडियन एअरफोर्स मॅरेथॉन 2026’ मध्ये सहभागी होणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे 3 आणि 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्री उपनगरीय मार्गावर दोन विशेष सेवा चालवणार असल्याची माहिती गुरुवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार देण्यात आली. भारतीय वायुसेनेचे फ्लाइंग ऑफिसर निर्मल जित सिंग सेखों यांच्या स्मरणार्थ या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. कल्याण-सीएसएमटी विशेष गाडी मुख्य मार्गावरील ‘कल्याण-सीएसएमटी मॅरेथॉन विशेष’ गाडी 4 ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजता कल्याणहून सुटेल आणि पहाटे 4 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. पनवेल-सीएसएमटी विशेष गाडी असून हार्बर मार्गावरील ‘पनवेल-सीएसएमटी मॅरेथॉन विशेष’ गाडी पहाटे 2.40 वाजता पनवेलहून सुटेल आणि पहाटे 4 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

या दोन्ही विशेष गाड्या त्यांच्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील, असे मध्य रेल्वेने सांगितले. ‘सेखों इंडियन एअरफोर्स मॅरेथॉन 2026’ मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी विशेष सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना या सेवांची नोंद घेण्याचे आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेने गुरुवारी जाहीर केले की, ‘आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका’ (third line) प्रकल्प आणि ‘अप यार्ड लाईन’चा इगतपुरीच्या दिशेने विस्तार करण्याच्या कामासाठी 7 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत कसारा येथे 12 दिवस विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. कामाच्या पहिल्या टप्प्यात, म्हणजेच 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान, उपनगरीय (लोकल) तसेच मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या सेवेमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे.

हेही वाचा : आशियाई क्रीडा स्पर्धेत नितेश सिवाचची रौप्यपदकाची कमाई; पुरुषांच्या 97 किलो ग्रीको-रोमन वजनी गटात केली उल्लेखनीय कामगिरी

कसारा यार्डमध्ये ‘प्री-नॉन-इंटरलाकिंग’ (Pre-NI), ‘नॉन-इंटरलाकिंग’ (NI) आणि ‘पोस्ट-नॉन-इंटरलाकिंग’ (Post-NI) संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी हे ब्लॉक्स घेतले जात आहेत. या ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव आणि कसारा दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाही, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी, सीएसएमटी (CSMT) ते कसारा दरम्यान धावणाऱ्या अनेक लोकल गाड्यांचा प्रवास आसनगाव स्थानकावरच थांबवला जाईल (short-terminated). सीएसएमटीवरून दुपारी 1.10, 2.17, 2.46 आणि 4.50 वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल गाड्या आसनगावपर्यंतच चालवल्या जातील. त्याचप्रमाणे, कसारा येथून दुपारी 3.35, 4.16, 5.02 आणि सायंकाळी 6.17 वाजता सुटणाऱ्या कसारा-सीएसएमटी (CSMT) लोकल गाड्या अनुक्रमे असणगाव येथून दुपारी 4.12, 4.54, 5.39 आणि सायंकाळी 6.54 वाजता सुटतील. 7 आणि 8 ऑक्टोबर रोजीच्या ब्लॉकपूर्वी सीएसएमटी ते कसारा धावणारी शेवटची लोकल दुपारी 12.30 वाजता सुटेल, तर कसारा ते सीएसएमटी धावणारी शेवटची लोकल कसारा येथून दुपारी 2.42 वाजता सुटेल, असे निवेदनात म्हटले आहे. ब्लॉकनंतर सीएसएमटी ते कसारा धावणारी पहिली लोकल सीएसएमटीवरून सायंकाळी 6.28 वाजता सुटेल, तर कसारा ते सीएसएमटी धावणारी पहिली लोकल कसारा येथून रात्री 8.35 वाजता सुटेल. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या ब्लॉकदरम्यान उपनगरीय रेल्वेच्या चार फेऱ्या रद्द केल्या जातील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version