Hardik Pandya Trade IPL 2027 : हार्दिक पांड्याला 25 कोटींसह थेट कर्णधारपदाची बंपर ऑफर; या संघासोबत आतापर्यंतची सर्वात मोठी डील होणार?

हार्दिक मधल्या फळीतील आक्रमक फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि नेतृत्वगुण या तिन्ही निकषांवर पूर्णपणे खरा उतरत असल्याने या संघाची पहिली पसंती ठरत आहे.

Hardik Pandya Trade IPL 2027 : हार्दिक पांड्याला 25 कोटींसह थेट कर्णधारपदाची बंपर ऑफर; या संघासोबत आतापर्यंतची सर्वात मोठी डील होणार?

Hardik Pandya IPL 2027 KKR Captaincy Offer: आयपीएल 2027 च्या आगामी हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट विश्वात खेळाडूंच्या अदलाबदलीची (Trade) जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आगामी मोसमात कोणत्या संघाकडून खेळणार, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने केकेआरला एका अनुभवी व आक्रमक भारतीय कर्णधाराची तीव्र गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केकेआरने हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करून थेट कर्णधारपदाची धुरा सोपवण्याची मोठी ऑफर दिल्याचे समोर येत आहे.

चेन्नई नव्हे, तर केकेआर शर्यतीत आघाडीवर  
यापूर्वी हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चर्चा सुरू असल्याच्या बातम्या होत्या. त्यावेळी सीएसकेकडून शिवम दुबे, आयुष म्हात्रे किंवा डेवाल्ड ब्रेविस यांच्या अदलाबदलीचा पर्याय समोर ठेवला गेला होता. मात्र, आता केकेआरने या शर्यतीत थेट उडी घेतल्याने संपूर्ण गणित बदलले आहे. केकेआर व्यवस्थापनाने हार्दिकसाठी आपले दरवाजे उघडले असून, तो मधल्या फळीतील आक्रमक फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि नेतृत्वगुण या तिन्ही निकषांवर पूर्णपणे खरा उतरत असल्याने संघाची पहिली पसंती ठरत आहे.

हेही वाचा – Shubman Gill : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शुभमन गिल संघाबाहेर, या खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी; हे कारण आलं समोर

कॅमेरून ग्रीनच्या जागी हार्दिक? 25 कोटींचे कॅश डील अन् ऑल-आऊट ट्रेड  
हार्दिकचा हा व्यवहार कसा होणार, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. केकेआरने आयपीएल 2026 च्या लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला 25.20 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी केले होते. संघात ग्रीन आणि हार्दिक हे दोन सारखेच अष्टपैलू खेळाडू एकत्र खेळवणे कठीण असल्याने, ग्रीन आणि हार्दिक यांची थेट अदलाबदल (Trade) होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. किंवा ग्रीनच्या 25 कोटी रुपयांच्या कराराच्या मूल्यावरच केकेआर हार्दिक पांड्याला थेट ऑल-कॅश डीलद्वारे (Cash Deal) ताफ्यात घेऊ शकते.

मुंबई इंडियन्सची अधिकृत भूमिका अन् भविष्यातील मोठे निर्णय
हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत सोशल मीडियावर उठलेल्या वादंगानंतर मुंबई इंडियन्सने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या हंगामाचा आढावा (Post-Season Review) घेतला जात असून कोणत्याही फ्रेंचायझीसोबत अधिकृत ट्रेडबाबत चर्चा झालेली नाही, असे मुंबई इंडियन्सच्या वक्तव्यात सांगण्यात आले आहे. मात्र, आढावा पूर्ण झाल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असा संकेतही त्यांनी दिला आहे. त्यामुळे 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सला यश मिळवून देणारा आणि 2024 मध्ये पुन्हा मुंबईत परतलेला हार्दिक 2027 मध्ये केकेआरची जर्सी घालणार की मुंबईतच राहणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा – BCCI Pesion Scheme: खेळाडूंच्या आर्थिक सुरक्षेचा बीसीसीआयचा फॉर्म्युला! अजिंक्य रहाणेला मिळणार इतके निवृत्तीवेतन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number