IND vs ENG: रोहित शर्माचं झुंजार शतकही ठरलं निष्फळ! लॉर्ड्सवर भारताचं स्वप्न भंगलं; शेवटच्या क्षणी इंग्लंडने हिसकावला विजय

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना ऐतिहासीक लॉर्ड्सवर पार पडला. यावेळी भारताचा निकाल निराशाजनक लागला असून इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव करत एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

IND vs ENG: रोहित शर्माचं झुंजार शतकही ठरलं निष्फळ! लॉर्ड्सवर भारताचं स्वप्न भंगलं; शेवटच्या क्षणी इंग्लंडने हिसकावला विजय

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना ऐतिहासीक लॉर्ड्सवर पार पडला. यावेळी भारताचा निकाल निराशाजनक लागला असून इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव करत एकदिवसीय मालिका जिंकली आहे. यावेळी नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्यामुळे इंग्लडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 388 धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लंडने दिलेलं हे आव्हान पूर्ण करण्याचा पाठलाग करत भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 360 धावा केल्या.

ज्यामुळे भारताला हे आव्हान गाठता आलं नाही. या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 27 धावांनी पराभव केला असून भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी अक्षरश: रडवलं. यावेळी लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाकडून बेन डकेटने 141 धावांची वादळी खेळी केली. तर दुसरीकडे जॉस बटलरने एकदिवसीय सामन्यांमध्ये टी-20 प्रमाणे फलंदाजी करताना 13 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या. 

हेही वाचा- India Zimbabwe: गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत कोण सांभाळणार जबाबदारी; हेड कोचशिवाय भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचे पाठलाग करत सुरुवातीला भारताचा कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी 147 धावांची भागीदारी करत चांगली सुरूवात करून दिली. शुबमन गिल 77 धावा करत बाद झाल्यानंतर पुढे रोहित शर्माला विराट कोहलीची साथ मिळाली. पुन्हा या जोडीने 113 धावांची भागीदारी केली. त्यानंतर  रोहित शर्मा 110 चेंडूत 138 धावा करून बाद झाला.

तसेच पुढे इशान किशन 12 चेंडूत 14 धावा करून बाद झाला तर उपकर्णधार श्रेयस अय्यर 3 चेंडूत शून्यावर बाद झाला. यासह भारताच्या धावगतीत कमालीचा घसरण झाली. पुढे विराट कोहलीने 60 चेंडूत 74 धावांची खेळी केली. केएल राहुल 8 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. तसेच गोलंदाजांमध्ये भारताकडून प्रसिद्ध कृष्णाला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या तर प्रिन्स यादवला 1 विकेट घेण्यात यश आलं. गुरनूर ब्रारने त्याच्या 10 ओव्हरमध्ये 97 रन दिल्या. प्रिन्स यादवने 79, अर्शदीपने 72, प्रसिद्धने 69 आणि अक्षरने 61 रन दिल्या. यासह इंग्लंडने 3 वनडे मॅचची सीरिज 2-1 ने जिंकली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number