RCB Ticket Black Marketing: RCB च्या विजयाचा आनंद लुटणाऱ्या चाहत्यांची लूट! चिन्नास्वामी स्टेडियममधील कँटीन कर्मचाऱ्याने केलं भयंकर कांड

चिन्नास्वामी स्टेडियममधील कँटीनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी तिकीट काळाबाजार प्रकरणी रंगेहाथ पकडले आहे.

RCB Ticket Black Marketing: RCB च्या विजयाचा आनंद लुटणाऱ्या चाहत्यांची लूट! चिन्नास्वामी स्टेडियममधील कँटीन कर्मचाऱ्याने केलं भयंकर कांड

RCB Ticket Black Marketing: आयपीएल 2026 मध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ मैदानावर विजयाचा चौकार मारत असतानाच, मैदानाबाहेर चाहत्यांच्या खिशावर दरोडा टाकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चिन्नास्वामी स्टेडियममधील कँटीनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी तिकीट काळाबाजार प्रकरणी रंगेहाथ पकडले आहे. त्याने आरसीबीच्या चाहत्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कँटीन कर्मचाऱ्याचा असा होता प्लॅन
आरसीबीचा मोठा चाहता वर्ग आणि त्यांची प्रचंड लोकप्रियता पाहून आरोपी चंद्रशेखर याने तिकीट विक्रीचा अवैध धंदा सुरू केला होता. स्टेडियममधील कँटीनमध्ये काम करत असल्याचा फायदा घेत तो तिकिटांची अफरातफर करायचा. आरोपीने आतापर्यंत सुमारे 180 तिकिटांचा काळाबाजार केला आहे. ही तिकिटे त्याने मूळ किमतीपेक्षा अनेक पटींनी जास्त, म्हणजेच 15 ते 19 हजार रुपयांना एक या दराने विकली. या संपूर्ण काळाबाजारातून त्याने आतापर्यंत 25 लाख रुपयांहून अधिक अवैध कमाई केल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय गुन्हे शाखेची (CCB) धडक कारवाई
बंगळुरूच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) सापळा रचून चंद्रशेखरला अटक केली आहे. तपासादरम्यान समोर आले की, तो थेट मोबाईल फोनद्वारे गरजू चाहत्यांशी संपर्क साधायचा आणि वेगवेगळ्या श्रेणीतील तिकिटे चढ्या दराने विकायचा. प्रामुख्याने आरसीबी विरुद्ध केकेआर आणि आरसीबी विरुद्ध लखनऊ या 'हाय-व्होल्टेज' सामन्यांची तिकिटे त्याने विकल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखी काही लोकांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

हेही वाचा – Sachin Tendulkar On Shreyas Iyer Catch : कुणालाच कदर नाही रे…, श्रेयसच्या कॅचची खुद्द क्रिकेटच्या देवाने घेतली दखल, पोस्ट करत म्हटलं…

चाहत्यांचा संताप आणि संघाची दमदार कामगिरी
गेल्या वर्षी 17 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून आरसीबीने जेतेपद पटकावल्यामुळे यंदा चाहत्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. यंदाही संघाने 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. अशा स्थितीत मैदानावर जाऊन सामना पाहण्याची तीव्र इच्छा असलेल्या सामान्य चाहत्यांना अधिकृत तिकीट मिळत नव्हते, तर दुसरीकडे कँटीन कर्मचारी मात्र तिकीट दडवून त्याची अवैध विक्री करत होता. या प्रकारामुळे आरसीबीच्या निष्ठावान चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number