FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक 2026 उपांत्य फेरीचे वेळापत्रक निश्चित; महामुकाबल्यात ‘हे’ दोन संघ येणार आमनेसामने

12 जुलै रोजी झालेल्या चुरशीच्या लढतीत इंग्लंडने नॉर्वेचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक 2026 उपांत्य फेरीचे वेळापत्रक निश्चित; महामुकाबल्यात ‘हे’ दोन संघ येणार आमनेसामने

FIFA World Cup 2026:  विश्वचषक 2026 मधील शेवटच्या दोन उपांत्यपूर्व सामन्यांचे निकाल लागल्यानंतर आता उपांत्य फेरीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. 12 जुलै रोजी झालेल्या चुरशीच्या लढतीत इंग्लंडने नॉर्वेचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानंतर झालेल्या अंतिम उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने आपले वर्चस्व राखत स्वित्झर्लंडवर 3-1 असा सहज विजय मिळवला. या विजयांसह अंतिम 4 संघ निश्चित झाले असून, पहिला उपांत्य सामना 15 जुलै रोजी फ्रान्स आणि स्पेन यांच्यात रंगणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात 16 जुलै रोजी अर्जेंटिनाचे आव्हान इंग्लंडसमोर असेल.

स्पेन विरुद्ध फ्रान्स ऐतिहासिक संघर्ष: आकडेवारीमध्ये स्पेनचे पारडे जड
टूर्नामेंटमधील पहिला उपांत्य सामना 15 जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता खेळवला जाईल. या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या आजवरच्या कामगिरीवर नजर टाकल्यास ऐतिहासिकदृष्ट्या स्पेनचा वरचष्मा राहिला आहे. फ्रान्स आणि स्पेन यांच्यात आतापर्यंत झालेल्या एकूण 38 सामन्यांपैकी स्पेनने 18 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर फ्रान्सला केवळ 13 सामने जिंकता आले आहेत आणि 7 सामने बरोबरीत सुटले आहेत. मात्र, फिफा विश्वचषकाच्या इतिहासाचा विचार केल्यास, 2016 मधील 'राऊंड ऑफ 16' च्या एकमेव लढतीत फ्रान्सने स्पेनचा 3-1 असा पराभव केला होता.

गतविजेत्या अर्जेंटिनासमोर इंग्लंडचे आव्हान; अटलांटामध्ये होणार हाय-व्होल्टेज सामना
उपांत्यपूर्व फेरीत चमकदार कामगिरी करणारा गतविजेता अर्जेंटिना आता इंग्लंडविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा बहुप्रतिक्षित सामना 16 जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता अटलांटा येथील स्टेडियमवर खेळवला जाईल. इंग्लंडच्या विश्वचषकातील इतिहासाचा विचार केल्यास, त्यांनी 1966 मध्ये पश्चिम जर्मनीचा 4-2 असा पराभव करून एकमेव विश्वविजेतेपद मिळवले होते. त्यानंतर त्यांना केवळ 3 वेळाच उपांत्य फेरी गाठता आली आहे; ज्यामध्ये 1990 मध्ये जर्मनीकडून आणि 2018 मध्ये क्रोएशियाकडून त्यांना 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा – India vs England T20: 'या' अजब कारणामुळे थांबवण्यात आला भारत-इंग्लंड सामना; साऊदॅम्प्टनच्या मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा

अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड 'हेड-टू-हेड' रेकॉर्ड
फिफा विश्वचषकाच्या मंचावर अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले गेले आहेत. या परस्पर लढतींमध्ये इंग्लंडने 3 सामन्यांत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले आहे, तर अर्जेंटिनाला 2 सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश आले आहे. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्मा पाहता अटलांटा येथील ही लढत अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number