Harbhajan Slaps Sreesanth Video Viral : हरभजनने श्रीसंतच्या लगावली कानशिलात! IPL मधील सर्वाधिक वादग्रस्त फाईट; 18 वर्षांनंतर अनकट फुटेज प्रसिद्ध

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी 2008 च्या हंगामातील ही धक्कादायक दृश्ये सार्वजनिक केली आहेत, ज्यामुळे क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा या जुन्या वादाची चर्चा सुरू झाली आहे.

Harbhajan Slaps Sreesanth Video Viral :  हरभजनने श्रीसंतच्या लगावली कानशिलात! IPL मधील सर्वाधिक वादग्रस्त फाईट; 18 वर्षांनंतर अनकट फुटेज प्रसिद्ध

Harbhajan Slaps Sreesanth: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक असलेल्या हरभजन सिंग आणि एस. श्रीसंत यांच्यातील ‘कानशिलात लगावल्याच्या प्रकरणाचे’ न पाहिलेले फुटेज अखेर समोर आले आहे. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी 2008 च्या हंगामातील ही धक्कादायक दृश्ये सार्वजनिक केली आहेत, ज्यामुळे क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा या जुन्या वादाची चर्चा सुरू झाली आहे.

‘बियॉन्ड23’ पॉडकास्टवर मोठा खुलासा
ही घटना किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सवर मिळवलेल्या विजयानंतर घडली होती. गेल्या ऑगस्टमध्ये ‘बियॉन्ड23 क्रिकेट पॉडकास्ट’वर ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार मायकल क्लार्कसोबत बोलताना ललित मोदी यांनी हे फुटेज शेअर केले. थेट प्रसारणादरम्यान जे कॅमेरे टिपू शकले नाहीत, ते दृश्य मोदींच्या खासगी सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झाले होते.

“कॅमेरे बंद होते, पण माझा सुरक्षा कॅमेरा चालू होता”
या घटनेचा तपशील देताना ललित मोदी म्हणाले की, “सामना संपला होता आणि टीव्ही ब्रॉडकास्टचे कॅमेरे बंद झाले होते. मात्र, माझा एक वैयक्तिक सुरक्षा कॅमेरा सुरू होता. त्यात श्रीसंत आणि भज्जी यांच्यातील बाचाबाची चित्रित झाली. हरभजन त्याला फक्त एक ‘बॅक-हँडर’ मारतो, असे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.” हे फुटेज इतकी वर्षे प्रसिद्ध का केले नाही, यावर बोलताना त्यांनी आमच्याकडे 18 वर्षांचा अनुभव असून आता ही योग्य वेळ असल्याचे नमूद केले.

हेही वाचा – Rio Olympic Velodrome Fire: रिओ ऑलिम्पिक वेलोड्रोमच्या छताला भीषण आग; 80 जवानांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर थोडक्यात वाचवला ऐतिहासिक ठेवा

हरभजनवर झाली होती मोठी कारवाई
या हिंसक कृत्यामुळे हरभजन सिंगवर आयपीएलच्या 11 सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. या घटनेनंतर श्रीसंत मैदानात ढसाढसा रडताना दिसला होता, ज्याची दृश्ये त्यावेळी टीव्हीवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. मात्र, प्रत्यक्ष चापट मारतानाचे फुटेज पहिल्यांदाच समोर आल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number