Saturday, March 07, 2026 05:30:57 AM

Hardik Pandya fell on Gerhard Erasmus : नामिबियाच्या कर्णधारावर हार्दिक कोसळला, गेरहार्ड इरास्मसने काय केलं पाहा; मजेदार क्षण व्हायरल

गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या गट अ सामन्यात भारताने टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यावेळी हार्दिक पंड्याने या सामन्यात चमकदार कामगिरी केली.

hardik pandya fell on gerhard erasmus  नामिबियाच्या कर्णधारावर हार्दिक कोसळला गेरहार्ड इरास्मसने काय केलं पाहा मजेदार क्षण व्हायरल

गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या गट अ सामन्यात भारताने टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भारताने तब्बल 93 धावांसह नामिबियावर विजय मिळवला. गुरुवारी 12 फेब्रुवारीला पार पडलेल्या भारत विरुद्ध नामिबिया या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचा मान दिला. भारताकडून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इशान किशन व संजू सॅमसनने संघाला दणक्यात सुरूवात केली. दरम्यान यावेळी हार्दिक पंड्याने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. 

हेही वाचा- T20 World Cup 2026 : नवख्या नामिबियाची कडवी झुंज, पण टीम इंडियाचे गोलंदाज ठरले गेमचेंजर

या सामन्यादरम्यान 12व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शिवम दुबेने शॉट मारला. यावेळी एकीकडे भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या धाव घेताना आणि दुसरीकडे दुबेने मारलेला चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात कर्णधार गेरहार्ड इरास्मस या दोघांची एकमेकांना धडकून टक्कर झाली. ज्यात दोघेही मैदानावर कोसळले, यावेळी हार्दिक पांड्या थेट गेरहार्ड इरास्मसच्या अंगावर कोसळला, गेरहार्ड इरास्मस उठण्याचा प्रयत्न करत असताना ते असं दिसत होतं जसं की, गेरहार्ड इरास्मस हार्दिकला अंगावर घेऊन पुश-अप्स मारत आहे. येनंतर लगेचच दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन करून खिलाडूवृत्ती दाखवली. या दोघांचा हा गमतीशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. या मजेदार घटनेनंतर दोघेही हसताना दिसले, आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हार्दिक पांड्याने या सामन्यात 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 109 मीटर लांब मॉन्स्टर षटकार मारला. ऑफ स्टंपबाहेरच्या गुड लेंथ चेंडूला त्याने लॉन्ग-ऑफच्या वर स्टँड्समध्ये पाठवले. त्याचसोबत हार्दिक पांड्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावा केल्या. तसेच प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, त्याच्या प्रभावी अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. 
 


सम्बन्धित सामग्री