Hardik Pandya viral video: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा मैदानावर जितका धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो, तितकाच तो आपल्या ग्लॅमरस लाइफस्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नुकताच तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि यावेळी कारण आहे त्याचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ, जो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
त्या व्हिडिओत हार्दिकसोबत दिसते एक मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा. व्हिडिओमध्ये दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. माहिकाने काळ्या रंगाचे पफी जॅकेट आणि ट्रेंडी ट्राउझर घातले होते, तर हार्दिकने साधा पण स्टायलिश लूक कॅरी केला होता. कॅमेऱ्यांसमोर आल्यानंतर माहिका हार्दिकचा हात पकडण्याचा प्रयत्न करताना दिसते, मात्र कॅमेऱ्यांकडे लक्ष गेल्यावर पांड्या थोडासा मागे सरकतो. या छोट्याशा क्षणामुळेच सोशल मीडियावर चाहत्यांनी दोघांना लक्ष्य केलं आहे.
काही चाहत्यांना दोघांची जोडी 'फ्रेश' आणि 'क्यूट' वाटली, पण बहुतेकांनी हार्दिकला नताशा स्टॅन्कोविकपासूनच्या घटस्फोटानंतर पुन्हा रिलेशनमध्ये असल्याबद्दल ट्रोल केलं. अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलं की, 'पांड्या भाई झिंगाटच आहे!'
हेही वाचा: Rinku Singh Threat: टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी; 5 कोटी रुपयांची मागणी
माहिका शर्मा कोण आहे?
माहिका शर्मा ही 24 वर्षांची दिल्लीस्थित मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असून, तिला लाखो फॉलोअर्स आहेत. ती अनेक फॅशन ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करते आणि काही वेब प्रोजेक्ट्समध्येही झळकली आहे. हार्दिक आणि माहिका बराच काळ एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत. त्यामुळे दोघे डेट करत असल्याच्या चर्चा जोरात आहेत.
तथापि, दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही, एअरपोर्टवरील त्यांचा एकत्र व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
हार्दिकचा प्रवास
हार्दिकने 2020 मध्ये नताशा स्टॅन्कोविकशी लग्न केलं होतं आणि दोघांना एक मुलगाही आहे. पण काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर त्याचं नाव ब्रिटिश मॉडेल जॅसमिन वालिया सोबत जोडलं गेलं होतं, मात्र ती नाती जास्त काळ टिकली नाहीत.
आता माहिकासोबतच्या अफवांमुळे हार्दिक पुन्हा एकदा मिडिया आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. काहीजण या जोडगोळीला सपोर्ट करत आहेत, तर काही जण म्हणतायत 'हार्दिक पुन्हा प्रेमात पडला का?'