Harmanpreet Kaur World Record: हरमनप्रीत कौरचा जागतिक विक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ रेकॉर्ड करणारी ठरली जगातील पहिली महिला खेळाडू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरताच हरमनप्रीतच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.

Harmanpreet Kaur World Record: हरमनप्रीत कौरचा जागतिक विक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ रेकॉर्ड करणारी ठरली जगातील पहिली महिला खेळाडू

Harmanpreet Kaur World Record: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिला क्रिकेट विश्वात एक सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा टप्पा गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरताच हरमनप्रीतच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. या कामगिरीसह तिने न्यूझीलंडच्या अनुभवी खेळाडूचा विक्रम मोडीत काढला आहे. 

सुझी बेट्सला टाकले मागे
यापूर्वी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-20) सर्वाधिक सामने खेळण्याचा मान न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या नावावर होता. सुझीने 355 सामने खेळले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉससाठी मैदानात येताच हरमनप्रीत कौरने आपल्या कारकिर्दीतील 356 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून सुझी बेट्सला मागे टाकले. हरमनप्रीतने 2009 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

हरमनप्रीतची आतापर्यंतची कारकीर्द
गेल्या 17 वर्षांपासून सातत्याने भारतीय संघासाठी खेळणाऱ्या हरमनप्रीतची आकडेवारी तिची जिद्द स्पष्ट करते. तिने आतापर्यंत खालीलप्रमाणे सामने खेळले आहेत:

कसोटी: 6 सामने
एकदिवसीय (ODI): 161 सामने
टी-20 आंतरराष्ट्रीय: 189 सामने (टी-20 मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही तिच्याच नावे आहे)

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या अव्वल महिला खेळाडू
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता भारताची हरमनप्रीत कौर 356 सामन्यांसह अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला (355 सामने) मागे टाकत हा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी 349 सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर असून, भारताची माजी कर्णधार मिताली राज 333 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, न्यूझीलंडची सोफी डेव्हाईन 305 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – T20 World Cup: सिक्सर किंग शिवम दुबेचा रुद्र अवतार; 31 चेंडूत 66 धावा अन् दोन विकेट्स, नेदरलँड्सचं वर्ल्ड कपमधून पॅकअप

संघासाठी खेळत राहण्याची आशा; हरमनप्रीतची प्रतिक्रिया
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विचारले असता हरमनप्रीत म्हणाली, "ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. मला आशा आहे की मी भारतीय संघासाठी असेच कठोर परिश्रम करत राहीन आणि शक्य तितके सामने खेळत राहीन." सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनीही तिचे विशेष अभिनंदन केले. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने विजयाची लय कायम ठेवली असून कर्णधाराच्या या विक्रमाने संघाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number