FIFA World Cup 2026: फिफाचा ऐतिहासिक निर्णय; विजेत्यांना मिळणार ‘चॅम्पियनशिप रिंग्ज’; तुम्ही देखील करू शकता खरेदी

जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष 19 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर होणाऱ्या स्पेन विरुद्ध अर्जेंटिना या महामुकाबल्याकडे लागले आहे.

FIFA World Cup 2026: फिफाचा ऐतिहासिक निर्णय; विजेत्यांना मिळणार ‘चॅम्पियनशिप रिंग्ज’; तुम्ही देखील करू शकता खरेदी

FIFA World Cup 2026:  फिफा विश्वचषक 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष 19 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर होणाऱ्या स्पेन विरुद्ध अर्जेंटिना या महामुकाबल्याकडे लागले आहे. या महायुद्धात जो संघ बाजी मारेल, त्याला केवळ प्रतिष्ठेची सोन्याची ट्रॉफीच मिळणार नाही, तर फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंना अमेरिकेच्या 'सुपर बाउल' आणि 'NBA' च्या धर्तीवर अत्यंत आकर्षक अशा 'चॅम्पियनशिप रिंग्ज' देऊन गौरवले जाणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे यंदाच्या विश्वचषक अंतिम सामन्याचा उत्साह कमालीचा वाढला आहे.

विजेत्या संघासाठी 30 खास अंगठ्या राखीव; मैदानातच होणार तात्पुरते अनावरण
या ऐतिहासिक स्पर्धेची आठवण म्हणून एकूण 2026 विशेष अंगठ्यांची निर्मिती केली जात आहे. यातील सर्वात मौल्यवान आणि अधिकृत अशा 30 अंगठ्या विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील खेळाडू आणि मार्गदर्शकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 19 जुलै रोजी अंतिम सामन्याचा अंतिम शिट्टी वाजल्यानंतर, मैदानावरील मुख्य सादरीकरणादरम्यान विजेत्या संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांना तात्पुरत्या स्वरूपातील अंगठ्या प्रदान केल्या जातील. त्यानंतर, खेळाडूंची अचूक मापे आणि त्यांच्या नावांचे कोरीव काम करून या सर्व 30 अधिकृत अंगठ्या एका भव्य समारंभात खेळाडूंना सुपूर्द केल्या जातील.

कट्टर चाहत्यांनाही सुवर्णसंधी; मर्यादित संख्येत खरेदी करता येणार 'फिफा रिंग'
फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याची संधी चाहत्यांनाही मिळणार आहे. एकूण तयार करण्यात येणाऱ्या अंगठ्यांपैकी विजेत्या संघाच्या 30 अंगठ्या वगळता, उर्वरित 1996 अंगठ्या जगभरातील चाहत्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. फिफाचे अधिकृत लायसन्स असलेल्या या उत्पादनांची विक्री मर्यादित स्वरूपात केली जाणार असून, आपल्या आवडत्या खेळाडूंसारखीच अंगठी स्वतःच्या संग्रही ठेवण्याची ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचा – BCCI on Rohit Sharma Retirement: 2027 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माला संघातून वगळणार? BCCI ने दिलं स्पष्टीकरण

रचना आणि अस्सलतेची वैशिष्ट्ये

आकर्षक डिझाईन: या अंगठीच्या एका बाजूला फिफा विश्वचषक ट्रॉफीची हुबेहूब चमकदार प्रतिकृती असेल, तर दुसऱ्या बाजूला अंतिम सामन्यातील विजेता संघ (स्पेन किंवा अर्जेंटिना) आणि त्यांचा अधिकृत लोगो कोरलेला असेल.

युनिक नंबर आणि सर्टिफिकेट: बाजारात येणाऱ्या प्रत्येक अंगठीवर एक विशिष्ठ आणि युनिक नंबर दिलेला असेल. तसेच या अंगठीसोबत फिफाचे अधिकृत अस्सलतेचे प्रमाणपत्र दिले जाईल, ज्यामुळे या अंगठीचे ऐतिहासिक मूल्य अधिक वाढेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number