IPL 2026 Auction: आयपीएल 2026 च्या लिलावात इतिहास घडला; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ठरले सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू

विशेष म्हणजे या दोघांची मूळ किंमत अवघी 30 लाख रुपये होती. मात्र, त्यांच्या कामगिरीवर दाखवलेल्या विश्वासामुळे लिलावात बोली युद्ध रंगले आणि किंमत थेट कोट्यवधींवर जाऊन पोहोचली.

IPL 2026 Auction: आयपीएल 2026 च्या लिलावात इतिहास घडला; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ठरले सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू

IPL 2026 Auction: इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या लिलावात क्रिकेटविश्वाला थक्क करणारा क्षण पाहायला मिळाला. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोन्ही अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चेन्नई सुपर किंग्जने (CSK) दोघांनाही प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेत आयपीएलमधील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू बनवले. विशेष म्हणजे या दोघांची मूळ किंमत अवघी 30 लाख रुपये होती. मात्र, त्यांच्या कामगिरीवर दाखवलेल्या विश्वासामुळे लिलावात बोली युद्ध रंगले आणि किंमत थेट कोट्यवधींवर जाऊन पोहोचली. भारतीय खेळाडूसाठी चेन्नई सुपर किंग्जने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली मानली जात आहे.

प्रशांत वीरसाठी तगडी चुरस

प्रशांत वीरसाठी सुरुवातीला मुंबई इंडियन्सने बोली सुरू केली होती. मात्र, किंमत 1 कोटींच्या पुढे गेल्यानंतर मुंबईने माघार घेतली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी आक्रमक बोली लावली. अखेर चेन्नई सुपर किंग्जने सर्व संघांना मागे टाकत 14.20 कोटींची अंतिम बोली लावली आणि प्रशांत वीरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

हेही वाचा – Mumbai Indians: नीता अंबानींची रणनीती यशस्वी! मुंबईला दोन ट्रॉफी जिंकवणारा खेळाडू अवघ्या 1 कोटीत ताफ्यात, कोण आहे हा स्टार क्रिकेटर?

कार्तिक शर्मासाठी अनेक संघ मैदानात

कार्तिक शर्मासाठीही लिलावात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सने बोलीची सुरुवात केली, त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी बोली वाढवत नेली. किंमत 3 कोटींच्या आसपास पोहोचताच काही संघ बाहेर पडले. नंतर केकेआर आणि सीएसके यांच्यात जोरदार चुरस सुरू झाली. बोली 13 कोटींच्या पुढे गेल्यावर केकेआरने माघार घेतली. सनरायझर्स हैदराबादने अखेरच्या क्षणी 14 कोटींची बोली लावली, मात्र चेन्नईने 14.20 कोटींची निर्णायक बोली लावत कार्तिक शर्माला आपल्या संघात घेतले.

हेही वाचा – IPL Auction 2026: 'हा' क्रिकेटर ठरला सर्वात महागडा खेळाडू; लिलावात कोट्यवधींची चुरस, अखेर केकेआरने 25.20 कोटी देत मारली बाजी

आयपीएलमधील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू 

प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा (CSK) – 14.20 कोटी (2026)
आवेश खान (LSG) – 10 कोटी (2022)
कृष्णप्पा गौतम (CSK) – 9.25 कोटी (2021)
शाहरुख खान (PBKS) – 9 कोटी (2022)
राहुल तेवतिया (GT) – 9 कोटी (2022)
कृणाल पंड्या (MI) – 8.8 कोटी (2018)
आकिब नबी (DC) – 8.40 कोटी (2025)
वरुण चक्रवर्ती (KXIP) – 8.40 कोटी (2019)

याआधी चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरसाठी 14 कोटी रुपयांची मोठी बोली लावली होती. मात्र, सध्या दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून खेळत असून, लिलावापूर्वीच त्याला संघाने कायम ठेवले होते. आयपीएल 2026 च्या या लिलावाने स्पष्ट केले आहे की, युवा आणि अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझींचा विश्वास अधिकाधिक वाढत चालला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number