Rohit Sharma Huge Six Video: ‘हिटमॅन मोड’ ऑन! रोहित शर्माच्या उत्तुंग षटकाराने वानखेडे स्टेडियम दणाणलं, पाहा व्हिडीओ

सर्व फ्रँचायझींचे हंगामापूर्व सराव शिबिरे (Pre-season camps) सध्या जोरात सुरू असून, आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच विजेतेपदे मिळवून देणारा रोहित शर्मा सरावात पूर्णपणे मग्न झाला आहे.

Rohit Sharma Huge Six Video: ‘हिटमॅन मोड’ ऑन! रोहित शर्माच्या उत्तुंग षटकाराने वानखेडे स्टेडियम दणाणलं, पाहा व्हिडीओ

Rohit Sharma Huge Six Video: IPL 2026 चा थरार सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा फॉर्मात परतल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व फ्रँचायझींचे हंगामापूर्व सराव शिबिरे (Pre-season camps) सध्या जोरात सुरू असून, आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच विजेतेपदे मिळवून देणारा रोहित शर्मा सरावात पूर्णपणे मग्न झाला आहे. आगामी हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर म्हणून मोठी भूमिका बजावण्यासाठी तो सज्ज झाला असून, सराव सत्रातील त्याच्या एका भन्नाट व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरात रोहित शर्माने आपल्या फलंदाजीची धार दाखवण्यास सुरुवात केली आहे. फलंदाजीचा सराव करत असताना, त्याने वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर एक जबरदस्त ‘लॉन्ग-ऑन’ षटकार ठोकला. रोहितने आपला पुढचा पाय पुढे टाकत ज्या ताकदीने चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावला, ते पाहून स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. हा फटका मारल्यानंतर रोहित मजेशीर अंदाजात “पकडो तो…!” (Catch it!) असे ओरडतानाही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रोहितच्या या ‘विंटेज’ शॉटमुळे तो पुन्हा एकदा मोठ्या खेळीसाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.

मागील हंगामातील कामगिरी  
रोहित शर्मासाठी मागील IPL 2025 हंगाम वैयक्तिकरीत्या चांगला राहिला होता. त्याने 15 सामन्यांमध्ये 29.85 च्या सरासरीने 418 धावा फटकावल्या होत्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता. संपूर्ण हंगामात त्याने 41 चौकार आणि 22 षटकार ठोकले होते. त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा आलेख पाहिला तर रोहितने आतापर्यंत 272 सामन्यांमध्ये 29.73 च्या सरासरीने एकूण 7,046 धावा जमा केल्या आहेत. 132.09 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या रोहितच्या नावावर दोन शतके आणि 47 अर्धशतके नोंदवलेली आहेत.

हेही वाचा – Sanju Samson : “कारण त्या संघात माझा…” राजस्थान रॉयल्सची साथ सोडण्यामागचं खरं कारण संजूने सांगितलं; CSK च्या कॅप्टन्सीवर म्हणाला,

विश्रांतीनंतर पुनरागमन आणि टी-20 विश्वचषकाचे लक्ष्य
जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. त्याने आपला शेवटचा सामना 18 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर होता. मात्र, IPL 2026 मध्ये तो आपली जबरदस्त छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे, आगामी 2026 च्या T20 विश्वचषकासाठी ‘हिटमॅन’ची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली असल्याने, या आयपीएल हंगामातील त्याची कामगिरी भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number