Hockey World Cup 2026 Schedule: हॉकी चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) बुधवारी, 18 मार्च रोजी 2026 मध्ये होणाऱ्या महिला आणि पुरुष हॉकी विश्वचषकांचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या ऐतिहासिक स्पर्धा 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये संयुक्तपणे आयोजित केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तानसह एकूण 11 देशांनी पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये या विश्वचषकासाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना: तारीख आणि वेळ निश्चित
हॉकी विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांचे डोळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याकडे लागलेले आहेत. भारतीय पुरुष संघ आपल्या मोहिमेची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी इंग्लंडशी लढत होईल. सर्वांत महत्त्वाचा असलेला भारत-पाकिस्तान महासंग्राम 19 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. भारताचे गट फेरीतील (Group Stage) सर्व सामने ॲमस्टेलवीन येथील ‘वॅगेनर हॉकी स्टेडियम’वर होणार असून, भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) हे सामने सायंकाळी 6:30 वाजता सुरू होतील.
?? Mark your calendars! #HWC2026 The official match schedule for the FIH Hockey World Cup 2026 ?? Belgium & Netherlands is here — and it’s going to be unmissable. Get ready for world-class action and unforgettable moments ?✨ Full story: https://t.co/CCbgLOuGoh pic.twitter.com/6ZQqxkG3Xf — International Hockey Federation (@FIH_Hockey) March 18, 2026
हेही वाचा – Dinesh karthik : RCB च्या माजी खेळाडूच्या घरी आली लक्ष्मी; जुळ्या मुलांनंतर पुन्हा कन्यारत्न
भारतीय महिला संघाचे आव्हान आणि वेळापत्रक
भारतीय महिला संघ आपला सलामीचा सामना 16 ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिका आणि 20 ऑगस्ट रोजी इंग्लंडविरुद्ध त्यांचे महत्त्वाचे सामने होतील. या संपूर्ण स्पर्धेची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या महिला संघांमधील सामन्याने होणार असून 30 ऑगस्टपर्यंत हॉकीचा हा थरार रंगणार आहे. भारतीय महिला संघाने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली प्रगती पाहता, या विश्वचषकात त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.