अवघ्या दोन दिवसातच आयपीएल 2025 सुरू होणार आहे. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओस्टार किती कोटींचे उत्पन्न मिळवू शकते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनुसार, टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि टीम प्रायोजक (Team Sponsor) आणि मैदानी जाहिरातींमधून 6000 ते 7000 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. एमआय (MI) आणि सीएसके (CSK) यासारखे मुख्य टीम्स प्रत्येकी 100 ते 150 कोटी रुपये कमवू शकतात, तर बीसीसीआयला (BCCI) 800 ते 900 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.अशातच, प्रायोजकांची (Sponsor) मागणी अजूनही जास्त आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओस्टार, आयपीएलचे अधिकृत टीव्ही आणि डिजिटल हक्कधारक, यावर्षी जास्तीत जास्त कमाई करण्याचा प्रयत्न करत आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमासाठी प्रयोजकांच्या गर्दीत वाढ होत असल्यामुळे आयपीएल 2025 च्या जाहिरातींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
कंपनीने ठेवले एवढ्या कोटी रुपयांचे लक्ष्य:
आयपीएल 2025 कडे पाहता, कंपनीने 4,500 कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे. जे मागील वर्षी टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून कमावलेल्या अंदाजे 4,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, असे इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालात म्हटले आहे. आयपीएल 2025 साठी 12 प्रायोजक आधीच सामील झाले आहेत. मीडिया खरेदीदार यांचा अंदाज आहे की, 10 आयपीएल टीम एकत्रितपणे प्रायोजकत्व महसूलातून (Sponsorship Revenues) 1300 कोटी रुपयांपर्यंत महसूल (Revenues) उत्पन्न मिळवू शकतात.
संघांना प्रत्येकी इतके कोटी रुपये मिळण्याचा अंदाज:
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सारख्या प्रमुख संघांना प्रत्येकी 100 कोटी ते 150 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. बहुतेक, आयपीएल टीमने जवळपास सर्व प्रायोजकत्वाच्या मालमत्ता (Sponsorship Assets) विकल्या आहेत. प्रत्येक टीमला 8 ते 10 प्रायोजक मिळाले आहेत.
बीसीसीआय (BCCI) करू शकते इतक्या कोटींची कमाई:
दरम्यान, बीसीसीआय (BCCI) केंद्रीय प्रायोजकांकडून 800 ते 900 कोटी रुपयांपर्यंतची कमाई करेल, असे एका अहवालात म्हटले आहे. प्रमुख बीसीसीआय (BCCI) प्रायोजकांमध्ये टाटा ग्रुप (Tata Group), माय11सर्कल (My11Circle) सिएट (Ceat) आणि एंजलवन (AngelOne) यांचे समावेश आहे.