Asia Cup 2025 Final : पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… "ऑपरेशन सिंदूर मैदानातही सुरूच"

भारत पाकिस्तान विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ऑपरेशन सिंदूर मैदानातही सुरूच” असा संदेश देत पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टोला लगावल आहे.

Asia Cup 2025 Final : पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… &quotऑपरेशन सिंदूर मैदानातही सुरूच&quot

आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून नवव्यांदा विजेतेपद पटकावलं. तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि संजू सॅमसन यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्स राखून मात केली. या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे कौतुक करत खास प्रतिक्रिया दिली.
 
सामना संपल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भारताच्या विजयानंतर पुन्हा पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यांनी लिहिलं  *”खेळाच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. निकाल तोच आहे. भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. भारतीय खेळाडूंचं मनापासून अभिनंदन!”* मोदींच्या या पोस्टमुळे भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.


 
मात्र, पंतप्रधानांच्या या विधानाने पाकिस्तानच्या राजकारण्यांना चांगलीच मिर्ची लागली. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मोदींच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना टीका केली. ते म्हणाले – *“क्रिकेटची भावना नष्ट करून मोदी राजकारण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वागण्यामुळे शांती येणार नाही.”* त्यांनी भारत-पाक युद्धासंदर्भातही वादग्रस्त विधानं केली.
 
यापूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारताची 7 विमाने पाडल्याचा दावा केला होता. फक्त 72 तासांतच ख्वाजा आसिफ यांनी ती संख्या बदलून 6 जेट्स असा नवा दावा केल्याने पाकिस्तानच्या वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारताच्या विजयावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या अशा दाव्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेला उधाण आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number