ODI World Cup 2027: ICC कडून 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा मेगा प्लॅन तयार; 24 वर्षांनंतर आफ्रिकन खंडात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

2023 च्या विश्वचषकापेक्षाही मोठी व्याप्ती आणि अधिक सामने, अशा रणनीतीसह आगामी विश्वचषक एक नेत्रदीपक सोहळा ठरेल असे संकेत मिळत आहेत.<br/>

ODI World Cup 2027: ICC कडून 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा मेगा प्लॅन तयार; 24 वर्षांनंतर आफ्रिकन खंडात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

ODI World Cup 2027: 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी आतापासूनच जोमाने सुरू झाली असून, आयसीसीने (ICC) ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वात भव्य आवृत्ती बनवण्यासाठी कंबर कसली आहे. स्पर्धा सुरू व्हायला अजून एका वर्षाचा कालावधी शिल्लक असला, तरी चाहत्यांमध्ये आतापासूनच प्रचंड उत्सुकता आहे. 2023 च्या विश्वचषकापेक्षाही मोठी व्याप्ती आणि अधिक सामने, अशा रणनीतीसह आगामी विश्वचषक एक नेत्रदीपक सोहळा ठरेल असे संकेत मिळत आहेत.

तीन देशांकडे यजमानपद; नामिबियाला पहिल्यांदाच मोठी संधी
या विश्वचषकाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांकडे संयुक्तपणे देण्यात आले आहे. ICC ने एखाद्या 'असोसिएट नेशन'ला (नामिबिया) विश्वचषकाचे यजमानपद देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. जवळपास 24 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकदिवसीय विश्वचषक पुन्हा एकदा आफ्रिकन खंडात परतत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सामन्यांच्या संख्येत वाढ; 54 लढतींचा थरार रंगणार
आगामी विश्वचषकाची व्याप्ती वाढवण्यासाठी आयसीसीने सामन्यांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. 2023 च्या विश्वचषकात एकूण 48 सामने खेळले गेले होते, मात्र 2027 च्या आवृत्तीत एकूण 54 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार असून, 2003 च्या विश्वचषकातील लोकप्रिय फॉरमॅटचे पुनरुज्जीवन केल्यामुळे सामन्यांची संख्या वाढली आहे. यामुळे ही स्पर्धा केवळ मोठीच नसेल, तर अधिक रंजक आणि रोमांचक ठरणार आहे.

2003 चा ऐतिहासिक 'सुपर 6' फॉरमॅट पुन्हा अवतरणार
ICC ने 2027 साठी 2003 च्या विश्वचषकाचे यशस्वी स्वरूप (Format) पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 14 संघांची प्रत्येकी 7 संघांच्या दोन गटात विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातील अव्वल 3 संघ 'सुपर 6' टप्प्यासाठी पात्र ठरतील. या स्वरूपाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, साखळी फेरीत 'सुपर 6' मध्ये पोहोचलेल्या संघांविरुद्ध मिळवलेले गुण संघ पुढील फेरीतही सोबत घेऊन जाऊ शकतात. यामुळे प्रत्येक सामन्याचे महत्त्व शेवटपर्यंत टिकून राहणार आहे.

हेही वाचा – IPL 2026 RR vs CSK : आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार! CSK चे तिनही धुरंदर यंदा संघात नाही; आजच्या सामन्यात काय रणनिती?

दक्षिण आफ्रिकेत रंगणार सर्वाधिक 44 सामने
यजमानपद तीन देशांकडे असले तरी, क्रिकेटचा मुख्य थरार दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळेल. एकूण 54 सामन्यांपैकी 44 सामने एकट्या दक्षिण आफ्रिकेत पार पडतील. यासाठी जोहान्सबर्ग, केप टाउन आणि डर्बन यांसारख्या प्रमुख शहरांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित 10 सामने झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवले जातील. 2003 मध्ये भारतीय संघाने आफ्रिकेच्या भूमीवर अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, त्यामुळे आगामी स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number