T20 World Cup: बांगलादेशला ICC चा सर्वात मोठा दणका; वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी भारताचाच रस्ता धरावा लागणार

आयसीसीने भारताच्या बाजूने दिलेल्या या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाची कोंडी झाली आहे.

T20 World Cup: बांगलादेशला ICC चा सर्वात मोठा दणका; वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी भारताचाच रस्ता धरावा लागणार

नवी दिल्ली: मैदानावरची चुरस आता राजनैतिक संघर्षात बदलली असून क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे भारतातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, त्याचे पडसाद आता थेट 'आयपीएल' आणि आगामी 'टी-20 विश्वचषका'वर पडले आहेत. एका बाजूला बांगलादेशी खेळाडूंच्या सहभागावरून शाहरुख खान आणि 'केकेआर'ला भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले, तर दुसरीकडे आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा 'थयथयाट' एका झटक्यात शांत केला आहे. "भारतात येऊन खेळा, अन्यथा गुण गमावण्याची तयारी ठेवा," अशा कडक शब्दात आयसीसीने बांगलादेशला चपराक लगावली आहे.

मुस्तफिझुर रहमानला 'केकेआर'कडून बाहेरचा रस्ता

आयपीएलच्या रणधुमाळीत कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानशी करार केला होता. मात्र, बांगलादेशातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता, भारतीय चाहत्यांनी शाहरुख खानवर टीकेची झोड उठवली. बीसीसीआयने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कडक भूमिका घेतल्यावर, केकेआरने मुस्तफिझुरला करारमुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतला. भारताने बांगलादेशी खेळाडूंना 'आयपीएल'मधून बाहेरचा रस्ता दाखवताच, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा संताप अनावर झाला.

हेही वाचा: Thackeray Brother Interview : भ्रष्टाचार, मुंबई, मराठी माणूस आणि बरचं काही…; मतदानापूर्वी ठाकरे बंधूंची महामुलाखत, 1.40 मि. चा टीझर पोस्ट

बांगलादेशची 'विश्वचषक' स्थलांतराची मागणी फेटाळली

आयपीएलमधील अपमानाचा बदला घेण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला होता. हे सामने श्रीलंकेत किंवा इतरत्र हलवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, आयसीसीने एका व्हर्च्युअल बैठकीत बांगलादेशचा हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला. "भारतात खेळाडूंच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही, त्यामुळे सामने हलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे आयसीसीने ठामपणे सांगितले.

'गुण' कापले जाणार; आयसीसीचा मोठा झटका

जर बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात येण्यास टाळाटाळ केली, तर त्यांना त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील. आयसीसीने इशारा दिला आहे की, भारताबाहेर सामने खेळण्याची विनंती मान्य केली जाणार नाही आणि जर बांगलादेश संघ मैदानात उतरला नाही, तर त्यांचे 'पॉइंट्स' कमी केले जातील. यामुळे बांगलादेशला विश्वचषकातून बाहेर पडावे लागू शकते, ज्यामुळे त्यांच्या क्रिकेट बोर्डासमोर आता भारतात येण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.

शाहरुख खान आणि बीसीसीआयची भूमिका

या वादात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानवरही मोठी टीका झाली. बांगलादेशी खेळाडूला संघात स्थान दिल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. अखेर बीसीसीआयच्या निर्देशानंतर आणि लोकांच्या भावनांचा विचार करून केकेआरने माघार घेतली. भारताने दाखवलेल्या या 'आक्रमक पावित्र्या'मुळे बांगलादेश क्रिकेट सध्या बॅकफूटवर आले असून, जगभरात या वादाची चर्चा सुरू आहे.

क्रिकेटच्या राजकारणात बांगलादेश एकटा पडला?

बांगलादेश सध्या श्रीलंकेत सामने घेण्यासाठी आग्रही आहे, मात्र जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान अत्यंत मजबूत आहे. आयसीसीने भारताच्या बाजूने दिलेल्या या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाची कोंडी झाली आहे. आता बांगलादेश क्रिकेट संघ भारतात खेळायला येतो की विश्वचषकावर पाणी सोडतो, याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Demolition Encroachment : हायकोर्टाचा आदेश आणि 30 बुलडोझर मैदानात; जमावाकडून मध्यरात्री मोठा राडा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number