RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत ‘पटलन’ची गाडी पलटी! मुंबईचा सलग दुसरा पराभव तर पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानची अव्वल कामगिरी

मंगळवारी 7 एप्रिलला गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने दमदार कामगिरी करत पॉइंट्स टेबलमध्ये आपली अव्वल कामगिरी केली आहे.

RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत ‘पटलन’ची गाडी पलटी! मुंबईचा सलग दुसरा पराभव तर पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानची अव्वल कामगिरी

मंगळवारी 7 एप्रिलला गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने दमदार कामगिरी करत पॉइंट्स टेबलमध्ये आपली अव्वल कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स समोर खेळताना राजस्थानने मुंबईचा 27 धावांनी धुव्वा उडवला आहे. यावेळी पावसामुळे राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना 10 वाजून 10 मिनिटांनी सुरु झाला, हा सामना तब्बल अडीच तास उशीरा सुरु झाला ज्यामुळे 11 षटकांचाच सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानने मुंबईसमोर 151 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पुर्ण करत मुंबई इंडियन्स 123 धावांवर गारद झाला. 

हेही वाचा- David Warner Arrested : ऐन प्रीमियर लीगदरम्यान डेव्हिड वॉर्नरला अटक; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने झाला गंभीर गुन्हा दाखल
यावेळी राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने 39 आणि रियान परागने 20 धावांची खेळी खेळली. तर यशस्वी जैस्वालने नाबाद 77 धावा केल्या. तर दुसरीकडे मुंबईकडून रोहित शर्मा 5, सूर्यकुमार यादव 6 आणि रायन रिकेल्टन याने 8 धावा करत निराशाजनक सुरुवात केली. नमन धीर आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी 50 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे मुंबईला 9 विकेट्स गमावून 123 धावाच करता आल्या. यावेळी मुंबईसाठी अल्लाह गजनफर याने 2 विकेट्स मिळवल्या. तर शार्दूलने वैभवला आऊट करत एकमेव मात्र महत्त्वाची विकेट घेतली. तर राजस्थानसाठी रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर आणि संदीप शर्मा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. अशाप्रकारे राजस्थानने मुंबईला पराभूत करून सलग तिसरा विजय मिळवला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number